आपले शहर, आपला परिसर गणेशोत्सव काळात स्वच्छ राहावा, निरोगी राहावा ,सगळीकडे स्वच्छता राहावी ,आरोग्य नांदावे याकरिता स्वच्छतेबाबतचे तसेच गणेशोत्सव काळात महिलांना सुरक्षिततेचा अनुभव यावा याकरिता पोलीस प्रशासना बरोबरच आपली ही तेवढीच जबाबदारी असल्याचा सामाजिक संदेश प्रा. राजेश सस्ते यांनी दिला.
पिंपरी चिंचवड शहरातील मोशी परिसरात गणेशोत्सवानिमित्त अण्णासाहेब मगर सहकारी बँक मर्यादित भोसरी चे मा. चेअरमन प्रा.राजेश सस्ते यांनी गणेश उत्सवाच्या चौथ्या दिवशी मोशी , डुडुळगाव परिसरातील अनेक गणेश मंडळांना तसेच सोसायटी , अपार्टमेंट मधील गणेश मंडळांना भेटी दिल्या . सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. या मध्ये प्रामुख्याने त्रिरत्न मित्र मंडळ लक्ष्मीनगर,विनायक अपार्टमेंट डुडुळगाव,अनुष्का सोसायटी शिवाजीवाडी,सहकार मित्र मंडळ लक्ष्मीनगर ,वरद विनायक मित्र मंडळ लक्ष्मीनगर,मोरया मित्र मंडळ येथे प्रा.राजेश सस्ते यांच्या हस्ते गणेश आरती करण्यात आली .
तसेच गणेशोत्सव काळात महिला भगिनी या गणेशोत्सवाच्या निमित्ताने घराबाहेर पडून गणेश मंडळांना भेटी देत असतात, उत्सवाचा आनंद घेत असतात या काळात महिलांना सुरक्षा मिळावी यासाठी पोलीस प्रशासन योग्य रीतीने कामगिरी करत आहे. परंतु महिलांना सुरक्षिततेचा अनुभव मिळावा याची जबाबदारी फक्त पोलिसांचीच नाही तर आपली ही मोठी जबाबदारी असल्याचे प्रा राजेश सस्ते यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.
प्रा.राजेश सस्ते या गणेशोत्सव काळात अनेक गणेश मंडळांना भेटी देत आहे या उत्सव काळात अनेक गणेश मंडळांना तसेच सोसायटीमधील सोसायटी धारकांना प्रा. राजेश सस्ते यांनी मार्गदर्शन केले. गणेशोत्सवाच्या काळात सामाजिक उपक्रम राबविले जावे अनेकांना सामाजिक उपयोगी उपक्रमाचा लाभ मिळावा या हेतूने उपक्रम राबवावे. असा संदेश दिला. तसेच सोसायटी धारकांना स्वच्छतेबाबतचे तसेच सोसायटीतील संरक्षण यासंबंधी मार्गदर्शन केले..आरतीचा मंगल सुर आणि बाप्पाच्या चरणी वाहिलेली भक्ती यासाठी सर्वांचे मनःपूर्वक आभार.व्यक्त केले तसेच सर्वांच्या घरात सुख, शांती, समृद्धी नांदो अशी बाप्पाच्या चरणी प्रार्थना केली.