spot_img
spot_img
spot_img

जिल्हा माहिती अधिकारी पदी युवराज पाटील रुजू

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पुणे जिल्ह्याचे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून युवराज पाटील यांनी आज पदभार स्वीकारला. यावेळी माहिती अधिकारी सचिन गाढवे यांनी त्यांचे स्वागत केले.

पाटील यांनी यापूर्वी सहायक संचालक मंत्रालय, सहायक संचालक विभागीय माहिती कार्यालय,पुणे तर अकोला, वाशिम,सातारा,लातूर आणि जळगाव येथे जिल्हा माहिती अधिकारी या पदावर काम केले आहे.
जिल्हा माहिती कार्यालयामार्फत शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना, उपक्रम आणि विकासकामांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविणारे महत्वाचा दुवा मानला जातो. शासनाची ध्येयधोरणे आणि जनहिताचे कार्यक्रम प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील राहीन, असेही पाटील म्हणाले.
यावेळी जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!