शबनम न्यूज | प्रतिनिधी
पुणे महानगरपालिका शिक्षण विभाग व जिल्हा क्रीडा परिषद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय जिल्हा स्तर कुस्ती स्पर्धा २०२५-२६ मध्ये ढोले पाटील एज्युकेशन सोसायटीच्या ढोले पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्सच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
या स्पर्धेत महाविद्यालयातील विद्यार्थी कु. अर्जुन वर्पे याने ८० कि. वजनी गटात प्रथम क्रमांक पटकावला असून त्याची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तर कु. गुरप्रित सिंग याने ९२ कि. वजनी गटात द्वितीय क्रमांक मिळवून महाविद्यालयाचा मान उंचावला आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे सन्माननीय चेअरमन सागर ढोले पाटील सर यांनी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच प्राचार्य विठ्ठल गायकवाड, महाविद्यालयातील प्राध्यापक व विभाग प्रमुखांनीही विद्यार्थ्यांचा गौरव केला.