पिंपरी चिंचवड शहरातील भारतीय जनता पक्षाचे माजी उपमहापौर तुषार हिंगे यांची कालच पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष म्हणून निवड झाली होती या निवडीला अवघे 24 तासही होत नाही तर तुषार हिंगे यांनी आपल्या उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.
त्यांनी चार ओळीच्या आपल्या राजीनामा पात्रात नमूद केले आहे की माझी पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष म्हणून निवड झाली परंतु मी माझ्या वयक्तिक कारणामुळे उपाध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे या पुढील काळात एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मी पक्ष वाढीसाठी त्याच जोमाने काम करत राहील तरी माझा राजीनामा स्वीकार करावा.
हा राजीनामा साध्या शब्दात असला तरी पिंपरी चिंचवड शहरातील राजकीय क्षेत्रात या राजीनामाची मोठी चर्चा सुरू आहे. शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी कालच शहर कार्यकारिणी जाहीर केली परंतु तुषार हिंगे यांनी दिलेल्या राजीनामामुळे चर्चा रंगू लागल्या आहे.