शबनम न्यूज | प्रतिनिधी
पुणे फेस्टिवल आणि श्रमिक पत्रकार संघ पुणे यांच्यावतीने बालगंधर्व कलादालनातं शहरातील विविध दैनिकात कार्यरत असणाऱ्या छायाचित्रकारांनी टिपलेल्या छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले यावेळी पुणे फेस्टिवलचे प्रमुख उद्योजक कृष्णकुमार गोयल, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील, सचिव मंगेश फल्ले, पुणे फेस्टिव्हलचे सचिन आडेकर, आबा जगताप व श्रीकांत कांबळे यांच्यासह सर्व दैनिकतील छायाचित्रकार आणि पत्रकार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी अमितेश कुमार यांनी बारकाईने छायाचित्रांचे प्रदर्शन बघण्याचा आनंद घेतला या प्रदर्शनात सुमारे 300 फोटो फ्रेम लावण्यात आल्या होत्या. पुणे शहरातील विविध ठिकाणी वार्तांकनासाठी गेलेल्या छायाचित्रकारांनी टिपलेल्या क्षणचित्रांचे हे प्रदर्शन पाहून पोलीस आयुक्त भारावून गेले.ते म्हणाले की, हा उपक्रम अतिशय चांगला असून दरवर्षी असे प्रदर्शन पुणे फेस्टिवल च्या माध्यमातून भरवले गेले पाहिले. शहरातील दररोजच्या धावपळीच्या जीवनातील अत्यन्त सूक्ष्म बारकावे यात मला बघायला मिळाले.