पिंपरी चिंचवड : (मोशी प्रतिनिधी) पिंपरी चिंचवड शहरातील मोशी परिसरात गणेशोत्सवानिमित्त अण्णासाहेब मगर सहकारी बँक मर्यादित भोसरी चे मा. चेअरमन प्रा.राजेश सस्ते यांनी सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. या गणेशोत्सवानिमित्त आपल्या परिसरातील, आपल्या प्रभागातील सर्व कुटुंबीयांचे श्री मंगलमूर्ती सगळ्या चिंता, दुःख, प्रापंचिक विवंचना दूर करो आणि सर्वांना अधिकाधिक आनंद देवो,सुख देवो या शब्दात शुभेच्छा दिल्या. आज गणेशोत्सवाचा पहिला दिवस या मंगलमय वातावरणात मोशी परिसरातील शिवपुत्र मित्र मंडळ शिवाजी वाडी, येथे प्रा. राजेश सस्ते यांच्या हस्ते गणेश आरती करण्यात आली. यावेळी त्यांनी आपल्या प्रभागातील तसेच आपल्या परिसरातील मित्रमंडळी, नागरिक, रहिवासी यांना सर्वांना शुभेच्छा दिल्या.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी प्रा.राजेश सस्ते यांच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. आपल्या प्रभागातील नागरिकांना या गणेशोत्सवाच्या निमित्ताने अनेक समाजोपयोगी उपक्रमातून लाभ मिळावा या उद्देशातून प्रा. राजेश सस्ते हे नेहमी विविध उपक्रम राबित असतात त्यांनी आपल्या शुभेच्छा देताना सर्वच प्रभागातील नागरिकांना तसेच मित्रमंडळी यांना विघ्नहर्ता त्यांची सगळे विघ्न दूर करून व सुख-समृद्धी सर्वांनाच मिळो अशी गणेश चरणी प्रार्थना केली तसेच उपस्थित सर्वांचे आभार व्यक्त केले.