spot_img
spot_img
spot_img

अतिरिक्त आयुक्तांनी विसर्जन घाटांवरील सोयीसुविधांचा प्रभागनिहाय घेतला आढावा

शबनम न्यूज | प्रतिनिधी

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी महापालिकेच्या गड आणि ह प्रभागातील तर अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी अब प्रभागातील महत्त्वाच्या गणेश विसर्जन घाटांची पाहणी करून आवश्यक सोयीसुविधांचा सखोल आढावा घेतला.

शहरात दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक गणेश विसर्जनासाठी घाटांवर येतात. यंदाही या उत्सवात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होण्याची शक्यता लक्षात घेता महापालिकेने विशेष तयारी केली आहे. त्याअंतर्गत विविध घाटांवरील सुविधास्वच्छता व सुरक्षा यांचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी अतिरिक्त आयुक्त खोराटे यांनी ग प्रभागातील सुभाषनगर घाटपवनेश्वर घाटमहादेव मंदिर घाटदत्त मंदिर घाटड प्रभागातील पुनावळे राम मंदिर शेजारील घाटपिंपळे निलख येथील इंगवले पूल घाटपिंपळे गुरव घाट तसेच ह प्रभागातील कासारवाडी स्मशानभूमी लगतचा विसर्जन घाटदापोडी येथील हॅरीस ब्रिज घाट आणि जुनी सांगवी येथील श्री. वेताळ महाराज घाट अशा विविध ठिकाणांना भेट दिली. तरअतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी रावेतचिंचवडगावनिगडीकाळेवाडी या भागातील विसर्जन घाटांना भेट देत पाहणी केली.

या पाहणीदरम्यान त्यांनी पिण्याच्या पाण्याची उपलब्धताकृत्रिम विसर्जन हौदांची स्थितीप्रकाशयोजनादिशादर्शक फलकनिर्माल्य कुंडवाहतूक व्यवस्थापनतसेच आपत्ती व्यवस्थापनाची पूर्वतयारीबाबत आढावा घेतला. सर्व विसर्जन घाटांवर स्वच्छतेसाठी स्वतंत्र कर्मचारी नियुक्त करावेतनिर्माल्य संकलनासाठी स्वतंत्र कुंड आणि वाहने उपलब्ध ठेवागर्दीच्या नियंत्रणासाठी सुरक्षा रक्षक व स्वयंसेवकांची पथके तैनात कराआपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदत मिळण्यासाठी मोफत वैद्यकीय मदत केंद्रे व अॅम्ब्युलन्सची व्यवस्था करातसेच वाहतूक व्यवस्थापन सुरळीत राहण्यासाठी योग्य नियोजन कराअसे निर्देशही त्यांनी संबंधित विभागांना दिले.

या पाहणीवेळी महापालिकेच्या विविध विभागांचे अधिकारीकर्मचारी उपस्थित होते.

विसर्जन घाटांवरील सर्व सुविधा वेळेत उपलब्ध करून भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नयेयासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश दिले आहेत. पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी निर्माल्य व प्लास्टिक कचऱ्याची स्वतंत्रपणे विल्हेवाट लावा. कृत्रिम विसर्जन हौदे व नदी घाटांची नियमित स्वच्छता कराअशा सूचना आज पाहणी दरम्यान दिल्या आहेत.

– विजयकुमार खोराटेअतिरिक्त आयुक्तपिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी चिंचवड शहरातील सर्वच विसर्जन घाटांवर अधिक काटेकोर नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मूर्ती संकलनाची योग्य व्यवस्था करा. सर्व संबंधित विभागांनी नियोजित कालावधीत आवश्यक उपाययोजना पूर्ण करण्याच्या सूचना आज पाहणी दरम्यान दिल्या आहेत.

– तृप्ती सांडभोरअतिरिक्त आयुक्तपिंपरी चिंचवड महानगरपालिका

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!