spot_img
spot_img
spot_img

घरकुल मध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे 105 वी जयंती जल्लोषात साजरी

जगविख्यात साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान घरकुल आयोजित भव्यदिव्य अशी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे 105 वी जयंती अतिशय थाटामाटात जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये घरकुल परिसरामध्ये साजरी करण्यात आली. घरकुल स्थापनेपासून पहिल्यांदा यावर्षी प्रतिष्ठानचे अध्यक्ष मारुती जाधव यांच्या पुढाकाराने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली. जयंतीच्या निमित्ताने गौरव माझा महाराष्ट्राचा या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्या निमित्ताने घरकुल मधील समाज बांधवांनी व नागरिकांनी अतिशय उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला तसेच घरकुल मधील सामाजिक क्षेत्रात, शैक्षणिक क्षेत्रात, क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सर्व तरुणांचे व तरुणींचे अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचे पुस्तक देऊन सन्मान सोहळा करण्यात आला.

कार्यक्रमाचे निमित्ताने आमदार महेश दादा लांडगे, आमदार अमित गोरखे, सामाजिक कार्यकर्ते निलेश नेवाळे, सौ कीर्ती मारुती जाधव, अरुणा भोसले, अरुण पाडुळे,पोपट हजारे, अजय पाताडे, गोरख पाटील, अजय साने, उस्तव कमिटी प्रमुख बाबासाहेब रसाळ, रोहिणी रोकडे, संदीप रोकडे, कविता कांबळे, मधुरा कांबळे,धनंजय भिसे, संदिपान झोंबाडे, भारती कांबळे, पल्लवी निकाळजे, दिपाली लोखंडे, ज्योती जाधव, दीक्षा जाधव, संतोष जाधव, निखिल आरणे, आकाश आढागळे, आकाश चव्हाण, दत्तात्रेय धर्मे, अभी भोसले, कुणाल पळसकर, यशवंत कन्हेरे, विश्वास सोहनी, शिवानंद चौगुले, अशोक मगर, दशरथ शिंदे, नागेश गवळी, बाबू भाऊ पाटोळे, अविनाश शिंदे, स्वरा डोंगरे, नाथा शिंदे, भगवान वैरागर, तसेच प्रतिष्ठानचे सुरेश वैरागर, राहुल मोरे, महेंद्र कुमार गायकवाड, शांताराम खुडे, संजय एडके, पोपट आरणे, अभिजीत भोसले,लालचंद अडागळे, सुखदेव कापसे, विष्णू निकाळजे, गुलाब वैरागर,कृष्णा खिलारे, विलास गडसिंग, श्रीकांत आवळे, दीपक मोतेवाड, प्रसाद महापुरे, संदीप दीक्षित,सुशांत भिंगारदिवे, अभिजीत वैरागर,रोहित मोरे, धनंजय जाधव, अक्षय वैरागर, तसेच प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!