spot_img
spot_img
spot_img

प्रारूप प्रभाग रचनेवर तीन दिवसांत दोन हरकती प्राप्त

शबनम न्यूज | प्रतिनिधी

महापालिकेच्या वतीने शुक्रवारी (दि. २२) प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. या रचनेविरुद्ध नागरिकांना ४ सप्टेंबरपर्यंत हरकती देण्याची संधी देण्यात आली आहे. मात्र, प्रारूप रचना जाहीर झाल्यापासून तीन दिवसांत आतापर्यंत केवळ दोन हरकती प्राप्त झाल्या आहेत.

प्राप्त हरकती प्रभाग ८ आणि प्रभाग २१ मधून आल्या आहेत. प्रभाग ८ मध्ये इंद्रायणी नगरला संतनगर नाव जोडण्याची मागणी करण्यात आली आहे, तर प्रभाग २१ मध्ये अनुसूचित जाती, जमाती तसेच आदिवासी मतदारांची संख्या असल्यामुळे त्या प्रभागाला मागासवर्गीय प्रभाग म्हणून घोषित करण्याची मागणी करण्यात आली आहे.

महापालिकेची ही प्रारूप प्रभाग रचना अंतिम टप्पा नसून लोकांचा अभिप्राय घेऊन अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. प्रशासनाने महापालिकेच्या संकेतस्थळावर संपूर्ण शहराचा नकाशा प्रसिद्ध केला. सामाजिक कार्यकर्ते, नागरिक, इच्छुक नकाशे पाहण्यासाठी येत आहेत. नकाशांचे मोबाइलवर छायाचित्रे घेण्यात येत आहेत. पालिकेच्या संकेतस्थळावर सर्व ३२ प्रभागांचे नकाशे प्रसिद्ध करण्यात आले आहेत. संकेतस्थळावर मुख्यपृष्ठ समोर आल्यानंतर नवीन प्रारूप प्रभाग रचना असे शीर्षक झळकत आहे.

दरम्यान इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरवात केली आहे. सोशल मिडीयावरून मेसेज पाठविले आहेत. तसेच गौरी-गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन करून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी सर्वच प्रभागामध्ये इच्छुकांनी विविध उपक्रम सुरू केले आहेत.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!