शबनम न्यूज | प्रतिनिधी
शहरातील रेल्वे स्टेशनलगतच्या तलावात हरविलेल्या तरुणीचा मृतदेह सापडला असून या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. साक्षी कांतीकुमार भावर (वय २२, रा. भीमाशंकर कॉलनी, वराळे मावळ, मूळगाव बऊर) असे तरुणीचे नाव आहे. ती घरी परतली नसल्याने आणि संपर्क होत नसल्याने तिच्या नातेवाइकांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती.
पोलीस निरीक्षक प्रविण कांबळे व उपनिरीक्षक भरत वारे यांनी मोबाइल लोकेशनच्या आधारे शोध सुरू केला असता साक्षीचे लोकेशन तलाव परिसरात असल्याचे समोर आले. तलावाच्या काठावर तिची बॅग व मोबाईल मिळाला. पाण्यावर तरंगणारे बूट दिसल्याने पोलिसांना संशय निर्माण आला. वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाने शोधमोहीम राबवून मृतदेह बाहेर काढला. तिला तत्काळ सीपीआर देऊन वाचविण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र डॉक्टरांनी तपासल्यानंतर तिला मृत घोषित केले. या कारवाईत निलेश गराडे, शुभम काकडे, गणेश गायकवाड, राजेंद्र बंडगे, राजू सय्यद व अनिश गराडे यांनी सहकार्य केले.