spot_img
spot_img
spot_img

गणेशोत्सवासाठी पीएमपीकडून रात्रीच्या जादा बस

शबनम न्यूज | प्रतिनिधी

गणेशोत्सवात पुण्यातील उपनगरे आणि आसपासच्या गावांमधून अनेक नागरिक शहरातील मध्यवर्ती भागात देखावे पाहण्यास येत असल्याने या काळात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. अनेकदा हे नागरिक पुण्यात येण्यासाठी त्यांच्या खासगी वाहनांचा वापर करीत असल्याने वाहतूक कोंडीदेखील होत असते. त्यामुळे पीएमपीकडून दरवर्षीप्रमाणे या वर्षीही या नागरिकांसाठी काही ठराविक मार्गांवर रात्रीच्या वेळेत अतिरिक्त बस फेऱ्या काढण्यात येणार आहेत.

त्यानुसार २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबरच्या काळात किमान ७८८ जादा बसेस सोडल्या जाणार आहेत. त्यानुसार २९, ३० ऑगस्ट आणि ५ सप्टेंबर रोजी १६८ अतिरिक्त फेऱ्या केल्या जाणार आहेत. तर ३१ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर आणि ६ सप्टेंबर रोजी ६२० अतिरिक्त फेऱ्यांचे आयोजन पीएमपीने केले आहे. या अतिरिक्त बससेवेसाठी दुपारनंतर चालणाऱ्या अतिरिक्त गाड्यांना ठरलेल्या दरापेक्षा १० रुपये जादा आकारले जाणार आहेत. शिवाय गणेशोत्सवात देण्यात येणारी रात्रीची बससेवा विशेष असल्याने रात्री १२ नंतर चालणाऱ्या गाड्यांना कोणत्याही प्रकारचा पास चालणार नाही. प्रशासनाचा हा निर्णय गणेशभक्तांसाठी दिलासादायक ठरणार आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!