शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या वतीने वाकड, ताथवडे, पुणावळे परिसरातील सोसायटी व स्थानिक नागरिकांसाठी गौरी गणपती सजावट स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष तुषार ताम्हाणे यांच्यावतीने आयोजित केलेले स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व सभासदांच्या घरी, सोसायटी मध्ये जाऊन परीक्षण करण्यात येईल. सामाजिक संदेश देणारा देखावा सजावटीला स्पर्धेत प्राधान्य देण्यात येईल, स्पर्धेत सहभागी होणाऱ्या घरगुती गौरी गणपती सजावटीचे फोटो पाठविणे अनिवार्य आहे. तसेच परीक्षक मंडळाचा निर्णय अंतिम राहणार आहे, या स्पर्धेत फक्त वाकड पुनावळे व ताथवडे मधील रहिवासीच सहभागी होऊ शकतात, या स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकांसाठी प्रथम, द्वितीय व तृतीय तसेच उत्तेजनार्थ बक्षीसे देण्यात येणार आहे. दोन लाखापर्यंत असणार आहे. यामध्ये सोसायटी पारितोषिक घरगुती पारितोषिक वरील पारितोषिक असे तीन विभाग विभागण्यात आले आहे. प्रत्येक विभागाला दोन लाखापर्यंतची बक्षिसे देण्यात येणार आहे, अशी माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे. तरी स्पर्धेत भाग घेणाऱ्या इच्छुकांनी त्वरित आपली नाव नोंदणी करावी व स्पर्धेत भाग घ्यावा, असे आवाहन तुषार ताम्हणे यांनी केले आहे.