spot_img
spot_img
spot_img

केशवनगर गणेश विसर्जन घाटावर आरती साठी चौथरा बांधा – मधुकर बच्चे

शबनम न्यूज | प्रतिनिधी

गौरी- गणपती चे आगमन होणार आहे, या पार्श्ववभूमीवर महावितरण समिती सदस्य मधुकर बच्चे यांनी दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील गणेश विसर्जन घाटाची पाहणी केली.

यावेळी मधुकर बच्चे म्हणाले, या ठिकाणी गणेश विसर्जन पूर्वी चौथऱ्यावर ठेऊन आरती करून गणेश विसर्जन केले जाते. परंतु गेल्या वर्षी आरती साठी योग्य चौथरा नव्हता त्यामुळे गणेश भक्तांची खूप निराशा झाली होती. रस्त्यावर उभे राहून तर काहींनी आजूबाजूला कठडेचा सहारा घेतला होता. गेल्या वर्षी या घाटावर दोन चौथारे बांधले आहेत ते दक्षिण उत्तर असे चुकीच्या पद्धतीने बांधले आहेत मात्र गणेश भक्त आरती पूर्व पश्चिम दिशा करतात ही बाब संबधीत पालिका आधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिली होती पण वेळ कमी आहे कारण सांगण्यात आले होते, तर या वर्षी तिच अवस्था आहे. म्हणून या घाटावर तीन चौथरे त्वरित बांधावे किंवा पाच टेबलची तात्पुरती व्यवस्था करावी गणेश भक्तांच्या भावनेशी खेळू नये असे आवाहन देखील मधुकर बच्चे यांनी केले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!