spot_img
spot_img
spot_img

महात्मा गांधी जयंतीनिमित्त ‘विचार प्रबोधन पर्व’ आयोजित करावे, ; ‘आप’ शहराध्यक्ष रविराज काळे यांची मागणी

शबनम न्यूज | प्रतिनिधी
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त (२ ऑक्टोबर २०२५) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने ‘विचार प्रबोधन पर्व’ आयोजित करण्यात यावे, अशी मागणी आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष रविराज बबन काळे यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.

महात्मा गांधींचे विचार व कार्य नवीन पिढीपर्यंत पोहोचणे अत्यंत आवश्यक असल्याचे काळे यांनी सांगितले. त्यांनी आयुक्त, उपायुक्त (जनसंपर्क विभाग) तसेच जनता संपर्क अधिकारी यांना लेखी निवेदन देऊन या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी विविध विभागांमध्ये समन्वय साधावा, असे आवाहन केले आहे.

या अनुषंगाने कार्यक्रमाचे स्वरूप, स्थळ, वेळापत्रक, मान्यवर अतिथी निमंत्रण, प्रसारमाध्यमे आणि जनजागृती या सर्व बाबींसाठी नियोजन बैठक घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

काळे यांनी विश्वास व्यक्त केला की, या उपक्रमाद्वारे शहरातील नागरिक, विशेषतः तरुण पिढी, गांधीजींच्या विचारांशी अधिकाधिक जोडली जाईल आणि सत्य, अहिंसा व राष्ट्रसेवेचे मूल्य समाजात रुजतील.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!