शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपळे निलख येथील बालगिर्यारोहक साई सुधिर कवडे वय वर्ष १६ याची लेह लदाख येथील कांगयात्से १ व कांगयात्से २ याशिखरांवर चढाई करण्याची मोहिम होती.
कांगयात्से शिखरं लदाख मधिल मर्खा खोऱ्यात येतात ११ दिवसांच्या या मोहिमेत एकूण १५ सभासद होते .. वातावरणाशी जुळवण्यासाठी प्रथम लेह मधे एक दिवस विश्रांती घेत शांती स्तुप ला भेट देऊन मोहिमेला लेह मधुन सुरवात झाली. लेह पासुन गाडीने तीन तासांचा प्रवास करत स्कियु ला पोहचण्यात आल,सुंदर अश्या मर्खा व्हॅली मधे छोट मोठ्या हिमनद्या पार करत चार दिवसानंतर सर्व टिम कांगयात्से शिखराच्या बेस कॅंप ५१०० मिटर ला दाखल झाली.
कांग यात्से १ हे शिखर तांत्रिकदृष्ट्या कठीण मानले जाते ज्याची चढाई अनुभवी गिर्यारोहकांसाठी सुद्धा आव्हानात्मक ठरते, ही चढाई तांत्रिकदृष्ट्या कठीण मानली जाते ज्यासाठी लक्षणीय शारीरिक तंदुरुस्ती आणि मूलभूत गिर्यारोहण कौशल्य आवश्यक आहे
या मोहिमेत प्रथम कांगयात्से २ हे शिखर चढाई कराण्याचे नियोजित असल्याने बेस कॅंप ला एक दिवस विश्रांती घेत रात्री १० वाजता कांगयात्से २ (६२५० मिटर) या शिखरावर सर्व टिम मार्गस्थ झाली शिखरमाथा गाठण्यासाठी जवळपास ८ ते १० तासांचा कालावधी लागतो सर्व साई ने या शिखरावर ५७०० मिटर पर्यंत चढाई केली भगवान सरांच्या मार्गदर्शनाखाली इतर दहा सदस्यांनी शिखरमाथ्याची चढाई पूर्ण केली.
सर्व सभासद कांगयात्से २ या शिखराची चढाई पूर्ण करून पुन्हा बेस कॅंप ला परतले. ठरल्याप्रमाणे एक दिवस विश्रांती करून कांगयात्से १ (६४०० मिटर ) या शिखरावर चढाई चालु केली ५/६ तासांच्या चढाई नंतर टिम कॅंप १ ला येउन पोहचली दुसऱ्या दिवशी कॅंप २ साठी निघायचे होते परतुं रात्रीत अचानक वातावरणात बदल झाला जो प्रत्येक हिमशिखरांवर सातत्याने होतच असतो पाऊस व बर्फवृष्टी मुळे काहिच दिसेनासे झाले त्यामुळे कॅंप १ वर वातावरण स्वछ होण्याची वाट बघत दोन दिवस टेंट मधेच थांबाव लागल वातावरण स्वच्छ झाल्यानंतर पुन्हा पुढच्या चढाईला सुरुवात केली व चार तासांत कॅंप २ ला पर्यंत येउन पोहचले …. याच दिवशी रात्री शिखरमाथा चढाई नियोजित होती, इथुन पुढे होणारी सर्व चढाई ही गिर्यारोहणाच्या साहित्यासोबत करावी लागणार होती येथुन शिखरमाथा गाठण्यासाठी जवळपास ७ ते ८ तास चढाई करावी लागते रात्री १० वाजता सर्व तयारी करून कॅंप २ वरुन शिखर माथा गाठण्यासाठी निघाले साई ने ६०५० मिटर पर्यंत चढाई केली … टिम मधील ६ सभासदांनी शिखर माथ्यापर्यंत यशस्वी रित्या चढाई केली.
साई हा लहानपणापासूनच साहसी गिर्यारोहण क्षेत्रात अग्रेसर असून त्याचे सात खंडातीत सात सर्वोच्च शिखर सर करित भारताचा तिरंगा फडकवण्याचे उद्दिष्ट आहे ,साईने वयाच्या 9 व्या वर्षी पहिली हिमालयीन गिर्यारोहणाची मोहिम केली होती २०१८ पासुन गिर्यारोहण करताना त्याने आत्तापर्यंत आफ्रिकेमधील किलीमांजारो,रशिया मधील एल्ब्रुस, नेपाळ मधिल एव्हरेस्ट बेस कॅंप, काला पत्थर, साऊथ अमेरिकेतील अकांकागुआ भारतातील स्टोक कांग्री, फ्रेंडशिप, पतालसु या शिखरांवर चढाई केलेली आहे तसेच २०२२ मधे साईने एव्हरेस्ट मॅरेथॉन ही पूर्ण केलेली आहे.
एव्हरेस्ट वीर भगवान चवले यांच्या द अल्पायनीस्ट या संस्थाच्या वतीने हि मोहिम आयोजीत करण्यात आली होती.
साई हा आदित्य कॉलेज बाणेर येथे इयत्ता आकरावी मधे शिकत असुन छत्रपती क्रिडा संकुल बालेवाडी येथे रेसिंग वॉरियर्स क्लब येथे दत्ता झोडगे व शाम दौंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ॲथलेटिक्स मधे ३००० मिटर धावण्याचा सराव देखील करत आहे