शबनम न्यूज | प्रतिनिधी
हिंजवडी आयटी हबमध्ये नोकरी लावतो, असे सांगत फ्लायनोट सॉस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून अनेकांची फसवणूक करण्यात आली. ही घटना हिंजवडी येथे घडली.
उपेश रंजीत पाटील (रा. हिंजवडी फेज २) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तसेच त्याच्या महिला साथीदाराच्या विरोधातही गुन्हा दाखल केला आहे. मयुर मुकुंद वाघ (२४, रा. काळेवाडी फाटा) यांनी शनिवारी (दि. २३) हिंजवडी पोलीस
ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपींनी फिर्यादींकडून नोकरी लावण्याच्या नवाखाली एक लाख ते अडीच लाख रुपये प्रशिक्षण शुल्काच्या नावाखाली घेतले. गुगल मिटद्वारे ३ महिन्यांचे ट्रेनिंग दिल्यानंतर नियुक्तीपत्र, ऑफर लेटर व पगार पत्रे देऊन विश्वास संपादन केला. मात्र, नंतर नापास झाल्याचे सांगत कोणताही पगार न देता आरोपींनी संपूर्ण रक्कम स्वतः च्या फायद्यासाठी वापरून घेतली. या प्रकरणी आरोपींनी एकूण १७लाख १६ हजार ५०० रुपयांचा अपहार केला आहे.