शबनम न्यूज | प्रतिनिधी
या कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता पक्षाचे प्राधिकरण चिंचवड मंडलचे अध्यक्ष जयदीप खापरे, अनुप मोरे, शर्मिला महाजन, ज्योतीताई कानिटकर यांनी केले. या कार्यक्रमाच्या उद्घाटन पिंपरी चिंचवड शहराच्या माजी उपमहापौर शैलजा मोरे, जयदीप खापरे, भाजपचे युवक प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे, सुशांत मोहिते, राधिका बोरलीकर, शर्मिला महाजन यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
या श्रावण महोत्सवात भजन स्पर्धा मंगळागौर खेळ दिनांक 22 ऑगस्ट व 23 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर सदन प्राधिकरण निगडी येथे संपन्न झाले. तसेच यावेळी गॉसिप गप्पा गाणी हा मनोरंजन करणारा कार्यक्रम 23 ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता संपन्न झाला, या श्रावण महोत्सवात भजन स्पर्धा तसेच मंगळागौर स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मिळाला तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या स्पर्धा ही संपन्न झाल्या.
भजन परीक्षक म्हणून ज्ञानेश्वर इटकरव जगता तसेच विनता जोशी, प्रविण कुरळकर यांच्यासह मंगळागौर परीक्षक ची जबाबदारी विद्या दंडवते, प्राजक्ता निफाडकर यांनी उत्तम प्रकारे पार पाडली.
या स्पर्धेत विजेत्यांना विविध बक्षीस व महिलांना पैठणी बक्षीस म्हणून देण्यात आल्या, या स्पर्धेचे खास आकर्षण गृह उद्योग वस्तूंचे प्रदर्शन होते.
सदर कार्यक्रम विधान परिषदेच्या सदस्या आमदार उमा खापरे पिंपरी चिंचवड शहराच्या माजी उपमहापौर शैलजा मोरे व भाजप युवक चे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांच्या संकल्पनेतून संपन्न झाला.
उत्साहात संपन्न झालेल्या या श्रावण महोत्सवाला पिंपरी चिंचवड शहराचे भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, ,जिल्हाध्यक्ष माजी आमदार अश्विनीताई जगताप, विधान परिषद आमदार उमाताई खापरे, उपाध्यक्ष विजय सिनकर, माजी उपमहापौर शैलजाताई मोरे, माजी उपमहापौर केशव दादा घोळवे ,सरचिटणीस संजय मंगुडेकर, सरचिटणीस शैला मोळक ,नामदेवजी ढाके ,राधिकाताई बोरलीकर ,दिपालीताई धानोरकर ,नीताताई कुशारे राजू बाबर, सिद्धेश शिंदे अनिरुद्ध संकपाळ आदी मान्यवरांनी या कार्यक्रमास हजेरी लावली.
कार्यक्रमाचे आयोजन जयदीप खापरे, अनुप मोरे, ज्योती कानिटकर यांनी केले होते. शर्मिला महाजन यांनी सूत्रसंचालन केले.