शबनम न्यूज | प्रतिनिधी
सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी (SSPU) व अमेरिकेतील वॉर विक कम्युनिटी कॉलेज (Wor Wic Community College) यांच्यात सामंजस्य करार (MoU) करण्यात आला आहे. या कराराअंतर्गत दोन्ही संस्थांच्या सामायिक उद्दिष्टावर भर देण्यात आला आहे – वर्कफोर्स डेव्हलपमेंट आणि विद्यार्थ्यांना भविष्यातील आर्थिक नवकल्पनांसाठी सज्ज करणे हा आहे. अमेरिका आणि भारतीय उच्चशिक्षण संस्थांमध्ये भागीदारी प्रस्थापित करून वर्कफोर्सच्या गरजा अधिक चांगल्या पद्धतीने पूर्ण करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम राबविण्यात आला आहे.
यावेळी स्वाती मुजुमदार, प्र-कुलपती, सिंबायोसिस स्किल्स युनिव्हर्सिटी; वॉर-विक कम्युनिटी कॉलेजच्या अध्यक्षा डॉ. डेब केस, उपाध्यक्ष (स्ट्रॅटेजिक इनिशिएटिव्हज आणि कम्युनिटी एंगेजमेंट); डॉ. डिड्रा जी. जॉन्सन, मुख्य माहिती अधिकारी आयमन इद्रीस आणि जनरल एज्युकेशनच्या डीन डॉ. पॅट्रिशिया एल. रायली हे उपस्थित होते.
आज डॉ. केसी आणि स्वाती मुजुमदार, प्र-कुलगुरू, सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी यांनी सॅलिस्बरी येथे सामंजस्य करार (MoU) केला. या कराराअंतर्गत विद्यार्थ्यांना स्टडी अब्रॉड व इंटर्नशिप्स, प्राध्यापकांच्या एक्स्चेंज प्रोग्राम्स व आंतरराष्ट्रीय उपक्रमांत सहभाग, भाषणे, व्याख्याने व तज्ज्ञ मार्गदर्शनासाठी आमंत्रित विद्वान, संयुक्त संशोधन, कोर्स विकास आणि अनेक संधी उपलब्ध होणार आहेत. हा वॉर-विकचा पहिलाच आंतरराष्ट्रीय करार असून स्थानिक विद्यार्थ्यांसाठी जागतिक स्तरावरील संधींचे दरवाजे उघडणारा ठरणार आहे.
हा विशेष फिनटेक कोर्स दोन टप्प्यांत राबवला जाणार आहे :
पहिला टप्पा : फिनटेक अवेअरनेस सिरीज
कालावधी : १ महिना
४ मोफत वेबिनार्स
विषय : जागतिक फिनटेक इकोसिस्टम, आर्थिक समावेशन व नेतृत्व, भविष्यातील करिअर संधी व उदयोन्मुख नोकरीच्या संधी, तसेच ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्सची इनोव्हेशनमध्ये भूमिका.
दुसरा टप्पा : ग्लोबल फिनटेक सर्टिफिकेशन प्रोग्राम
कालावधी : ६ महिने
उद्योग भागीदारांच्या सहकार्याने डिझाईन केलेला कार्यक्रम
उद्देश : आंतरराष्ट्रीय ज्ञान, उद्योगसापेक्षता आणि वर्कफोर्स रेडीनेस यांचा संगम घडवून भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर करिअर घडविण्याची संधी उपलब्ध करून देणे.
या उपक्रमाद्वारे फिनटेक क्षेत्रातील कौशल्ये आत्मसात करून विद्यार्थी भविष्यातील नोकरीच्या व उद्योजकतेच्या संधींसाठी तयार होतील, असा विश्वास स्वाती मुजुमदार, प्र-कुलपती, सिंबायोसिस स्किल्स युनिव्हर्सिटी यांनी व्यक्त केला.