spot_img
spot_img
spot_img

राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त विचार प्रबोधन पर्व आयोजित करावे,नियोजन बैठक घ्यावी – राहुल कोल्हाटकर

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने २ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त विचार प्रबोधन पर्व आयोजित करणे आणि प्रबोधन पर्वाच्या नियोजनाबाबत नियोजन बैठक घ्यावी अशी मागणी
सामाजिक कार्यकर्ते राहुल कोल्हाटकर यांनी मनपा आयुक्त शेखर सिंह यांच्या कडे केली आहे

२ ऑक्टोंबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि दिवंगत पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती आहे. दरवर्षी पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात येते तसेच स्वच्छता सेवा पंधरवडा असा उपक्रम राबवला जातो.

भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे योगदान आणि कार्य हे देशासाठी नव्हे तर जगातील अनेक राष्ट्रासाठी प्रेरणादायी आहेत. जगात २ ऑक्टोबर हा दिवस “आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन ” म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या अहिंसेच्या विचारांचा प्रसार जगभर केला जातो त्यानिमित्ताने विविध कार्यक्रम, विचारपर्व यांचे आयोजन केले जाते. येत्या २ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या वतीने सुद्धा विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यात यावे जेणे करून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे योगदान आणि कार्य तसेच त्याचे अहिंसेचे विचार हे शहरातील नागरिकांच्या पर्यंत या विचारपर्वाच्या माध्यमातून पोहचवले जातील.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने २ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त विचार प्रबोधन पर्व आयोजित करण्यात यावे आणि या प्रबोधन पर्वाच्या नियोजनाबाबत नियोजन बैठक त्वरीत घेण्यात यावी.अशी मागणी निवेदन द्वारे करण्यात आली आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!