पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना निवडणूक विभागाने आज जाहीर केली या प्रभाग रचनेत 2017 च्या प्रभाग रचनेनुसारच आहे या प्रभाग रचनेत कोणताही बदल करण्यात आला नाही.
प्रत्येक प्रभागा हा चार नगरसेवकांचा प्रभाग असेल, एकूण 32 प्रभाग आहेत सर्व प्रभागांचा मिळून एक नकाशा सुरुवातीला जाहीर करण्यात आला आहे.
यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
पिंपरी चिंचवड शहरातील लोकसंख्या 17 लाख 27 हजार 692 असून त्यात अनुसूचित जातीची दोन लाख 73 हजार 810 आणि अनुसूचित जमातीची 36 हजार 535 दर्शविण्यात आली आहे. प्रभागाची सरासरी लोकसंख्या 53 हजार 990 आहे प्रभागातील कमल लोकसंख्या 59,389 तर किमान 48 हजार 590 आहे.
प्रभाग रचनेत काहीतरी बदल होईल अशी अपेक्षा काही राजकारणी व इच्छुक उमेदवारांना होती परंतु तसे झाले नाही. राज्य निवडणूक आयोग यांनी अंतिम केलेली प्रभाग रचना आधी सूचनेद्वारे 26 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2025 या कालावधीत प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
हरकतींसाठी १४ दिवसांची मुदतप्रभाग रचनेवर चार सप्टेंबरपर्यंत हरकती व सूचना स्वीकारण्यात येणार आहेत. त्यानंतर पाच ते १२ सप्टेंबर या कालावधीत सुनावणी घेतली जाणार आहे. १३ ते १५ सप्टेंबर दरम्यान सुधारणांसह अंतिम प्रारूप रचना नगर विकास विभागाला सादर केली जाणार आहे. तीन ते सहा ऑक्टोबर या कालावधीत राज्य निवडणूक आयोगाने अंतिम मंजुरी दिल्यानंतर महापालिका आयुक्त अंतिम प्रभागरचना प्रसिद्ध करणार आहे.