शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले.
महानगरपालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीतील त्यांच्या प्रतिमेस तसेच मोरवाडी चौक येथील पुतळ्यास अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
अभिवादन प्रसंगी उप आयुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, सामाजिक कार्यकर्ते दिपक भोजने, भरत महानवर, सतीश खरात, ॲड. दत्ता शेंडगे, गणेश एकल, अतुल रकटे, सोनाताई गडदे, रेखाताई दुधभाते, रविंद्र कनखरे तसेच महापालिकेचे कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.
सांगवी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन
सांगवी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या पुतळ्यास उप आयुक्त अण्णा बोदडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी महापौर उषा उर्फ माई ढोरे, माजी नगरसदस्य संतोष कांबळे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, सामाजिक कार्यकर्ते सूर्यकांत गोफणे, नवनाथ बिडे, अजय दूधभाते, अभिमन्यू गाडेकर, दादासाहेब देवकते,कृष्णाराव गिरगुणे, हरिचंद्र गायके,शरद टेकाळे कल्याणराव बोडके,भालचंद्र मेटी, कृष्णराव बोचडे, बळीराम घोडके, नामदेव मार्कड, काशिनाथ घोडके, मोहन सलगर, महेश भागवत, विमल गाडेकर, छाया गायके, जालिंदर देवकते, लक्ष्मण शिंदे, विलास पाटील, मारुती भालेकर यांच्यासह नागरिक उपस्थित होते.