शबनम न्यूज | प्रतिनिधी
उन्नती सोशल फाउंडेशन यांच्यावतीने उन्न ‘ती’चा गणपती महोत्सव 2025 यानिमित्त इको फ्रेंडली गणेशा मोफत कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. सदर कार्यशाळा रविवार (दि. 24 ऑगस्ट 2025 ) रोजी सकाळी 10 वाजता आयोजले गेले आहे, अशी माहिती उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्ष तथा भाजपच्या चिंचवड विधानसभा महिला मोर्चा अध्यक्ष डॉ. कुंदाताई भिसे यांनी दिली आहे.
उन्नती सोशल फाउंडेशन गेल्या काही वर्षांपासून पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करत आहे. याबद्दल बोलताना कुंदा भिसे म्हणाल्या की, गणपती म्हणजे लहान, थोर सगळ्यांसाठी मोठा उत्सव असतो, दरवर्षी आपण इको फ्रेंडली गणेशा कार्यशाळा आयोजित करतो व आपण सर्वजण शाडू मातीचा गणपती स्वतः बनवण्याचा आनंद घेतो, यासाठी या उपक्रमाचे आयोजन केले असल्याचे कुंदाताई भिसे यांनी सांगितले.
या कार्यशाळे करिता शाडूची माती लागणार आहे ती उन्नती सोशल फाउंडेशनच्या कार्यालयात देण्यात येत येईल. तसेच या मोफत कार्यशाळेचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन कुंदाताई भिसे यांच्या वतीने करण्यात आले आहे. या कार्यशाळेबद्दल अधिक माहितीसाठी उन्नती सोशल फाउंडेशन कार्यालय, पिंपळे सौदागर येथे भेट द्यावी, अशी माहिती हि आयोजकांनी दिली आहे.