spot_img
spot_img
spot_img

पुणेकर चाहत्यांकडून शंतनु महेश्वरी आणि अवनीत कौर यांचे भव्य स्वागत

आगामी संगीतमय प्रेमकथा लव्ह इन व्हिएतनामसाठी उत्साह शिगेला

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पुण्यातील चाहत्यांनी मोठ्या संख्येने गर्दी करून शंतनु महेश्वरी आणि अवनीत कौर यांचे भव्य स्वागत केले. हे दोघे त्यांच्या बहुप्रतिक्षित चित्रपट लव्ह इन व्हिएतनामच्या प्रमोशनसाठी शहरात आले होते. १२ सप्टेंबरला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणारी ही संगीतमय प्रेमकथा प्रेक्षकांच्या मनाला आधीच भिडली असून, पुण्यातील कार्यक्रमांनी या कलाकारांच्या वाढत्या लोकप्रियतेची साक्ष दिली.

प्रमोशनल दौऱ्याची सुरुवात शहरातील एका महाविद्यालयात झाली, जिथे विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या गजरात कलाकारांचे स्वागत केले. शंतनु आणि अवनीत यांनी तरुणांशी संवाद साधला आणि चित्रपटातील गाण्यांवर थिरकून वातावरणात रंगत आणली. त्यामुळे महाविद्यालयाचा परिसर एका छोट्या उत्सवासारखा रंगून गेला.

यानंतरचा कार्यक्रम एका लोकप्रिय पुणे मॉलमध्ये पार पडला, जिथे चाहते कार्यक्रम सुरू होण्याच्या काही तास आधीच पोहोचले होते. कलाकारांचे आगमन होताच चाहत्यांच्या जयघोषाने संपूर्ण मॉल दुमदुमून गेला. शंतनु आणि अवनीत यांनी उत्साहाने प्रेक्षकांशी संवाद साधला, छायाचित्रे काढली आणि लव्ह इन व्हिएतनामच्या प्रवासाबद्दल मनमोकळेपणाने सांगितले.

मनाला भिडणारी गाणी, प्रभावी कथा आणि शंतनु–अवनीतची बहुचर्चित केमिस्ट्री यामुळे लव्ह इन व्हिएतनाम हा या हंगामातील सर्वात प्रतिक्षित चित्रपट ठरत आहे.

राहत शाह काझमी दिग्दर्शित ही हृदयस्पर्शी संगीतमय प्रेमकथा लव्ह इन व्हिएतनामचे निर्मितीकार्य राहत काझमी फिल्म स्टुडिओज, इनोव्हेशन्स इंडिया, ब्ल्यू लोटस पिक्चर्स यांनी केले असून, झी स्टुडिओज आणि अँड प्रॉडक्शन्स, जेबाईश एंटरटेनमेंट, तारीक खान प्रॉडक्शन्स आणि मँगो ट्री एंटरटेनमेंट यांच्या प्रस्तुत चित्रपटाचे प्रदर्शन १२ सप्टेंबर २०२५ रोजी होणार आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!