spot_img
spot_img
spot_img

PCMC : गुरूवारी ‘या’ भागात पाणीपुरवठा राहणार बंद

शबनम न्यूज | प्रतिनिधी

 पिंपरी चिंचवड महापालिकेच्या चिखली जलशुद्धीकरण केंद्राला वीज पुरवठा करणाऱ्या महापारेषण कंपनीच्या भोसरी आर.एस. उपकेंद्र येथे गुरुवारदि. २१ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत तातडीची वीजपुरवठा देखभाल व दुरुस्तीची कामे होणार आहेत. याकाळात वीज पुरवठा खंडित राहणार असल्याने चिखली जलशुद्धीकरण केंद्र येथून होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे गुरुवारी शहरातील या केंद्राच्या अखत्यारीत असणाऱ्या बोऱ्हाडेवाडीइंद्रायणीनगर सेक्टर ४११ व १२शिवरस्ताचक्रपाणी वसाहतधावडेवस्तीमोशीचऱ्होलीडुडुळगावचोवीसावाडी व इतर परिसरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

या भागात शुक्रवारदि. २२ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळचा पाणीपुरवठा अनियमित व कमी दाबाने होण्याची शक्यता आहे. तरी सर्व नागरिकांनी याबाबत नोंद घेऊन सहकार्य करावेअसे आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!