spot_img
spot_img
spot_img

‘देशी वनस्पती, झुडपे व वेली यांचे घनवन’ प्रकल्पाचे आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते उद्घाटन

शबनम न्यूज | प्रतिनिधी

देशात पिंपरी चिंचवड शहराची वेगाने विकसित होणारे शहर म्हणून ओळख आहे. शहराचा वेगाने होणारा विकास लक्षात घेता पर्यावरणीय संतुलन राखणे ही काळाची गरज आहे. देशी प्रजातींच्या वनस्पतींनी साकारलेले हे घनवन पक्षीप्राणी व सूक्ष्मजीवांसाठी सुरक्षित अधिवास ठरेल. आपल्या पुढील पिढीसाठी शहरातील हरित व निरोगी वातावरण निर्माण करणे ही आपली सामुहिक जबाबदारी आहे. त्यासाठी नागरिकांमध्ये हरितप्रेमाची जाणीव निर्माण करणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या उद्यान वृक्ष संवर्धन विभाग व वनराई सामाजिक संघटना यांच्या वतीने संत कबीर उद्यान परिसरात देशी वनस्पतीझुडपे व वेली यांचे घनवन’ या प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी आयुक्त शेखर सिंह बोलत होते.

या कार्यक्रमास महापलिकेचे उद्यान अधिक्षक महेश गारगोटेउद्यान अधिक्षक योगेश वाळूंजसनदी लेखापाल के.एल. बन्सलवनराई सामाजिक संस्थेचे धनंजय शेंडाळेसंजय कुंभारसंजय खटावकरसंजय अरुळकरकेतुल सोनिग्रासंजय शहाराजेश साहुराजेश कडूराजेंद्र बाबरमाणिक धर्माधिकारीनरेंश रावराजीव भावसारराजेंद्र भोसलेबन्सलउदय देवळे यांच्यासह   उद्यान विभागाचे अधिकारीकर्मचारीसंत कबीर उद्यान परिसर नागरी संघटना यांचे पदाधिकारीपर्यावरणप्रेमी नागरिक तसेच मोठ्या संख्येने स्थानिक रहिवासी उपस्थित होते.

 पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरात पर्यावरण संवर्धन आणि जैवविविधतेच्या जतनाच्या उद्देशाने  आयुक्त शेखर सिंह व अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यान व वृक्ष संवर्धन विभागाच्या वतीने शहरात देशी वनस्पतीझुडपे व वेली यांचे घनवनहा महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

 या उपक्रमांतर्गत उद्यानामध्ये देशी व आयुर्वेदिक झाडांची लागवड केली जाणार आहे.  या घनवनामध्ये पांडुडाकरवंदतरवडभारंगीपांढरफळीमुक्कुटशेंगअडुळसाकढीपत्ताफापटचित्रकनिरगुडीधायटी पांढरकुडाजाईजुुईकामिनीपिंपळगांजणतगरअनंतमेहेंदीरूईरातराणीजास्वंद डिंडूळदेवल्री आदींसह ३० पेक्षा अधिक देशी प्रजातींची लागवड करण्यात आली आहे. या दुर्मिळ व स्थानिक प्रजातींमुळे शहरातील पर्यावरणीय संतुलन राखण्यास हातभार लागणार असूनजैवविविधतेचे संवर्धन होणार आहे. या ठिकाणी पक्षीप्राणीकीटक आणि सूक्ष्म जीवांसाठी सुरक्षित नैसर्गिक अधिवास उपलब्ध होणार आहे.

शहरातील नागरिकांना विविध उपक्रमांच्या माध्यमातून पर्यावरणाशी जोडणे हे महापालिकेचे प्रमुख ध्येय आहे. घनवन प्रकल्पासारखा उपक्रम शहराच्या शाश्वत विकासाच्या दिशेने घेऊन जाणारा आहे.  शहरातील इतर उद्यानांमध्ये देखील या उपक्रमाची पुनरावृत्ती करण्यात येणार आहे.

– प्रदीप जांभळे पाटीलअतिरिक्त आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका

घनवनामध्ये वेगवेगळ्या देशी व दुर्मिळ वनस्पतींची लागवड केली असूनत्यांचे जतन व संवर्धनाचे काम उद्यान व वृक्ष संवर्धन विभागाच्या वतीने करण्यात येणार आहे. महापालिकेच्या तसेच शहरातील इतर उद्यानांमधील मोकळ्या जागेत अशा दुर्मिळ व औषधी वनस्पतींची लागवड करण्याचा महानगरपालिकेचा मानस आहे.

– महेश गारगोटेमुख्य उद्यान अधिक्षकपिंपरी चिंचवड महानगरपालिका.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!