spot_img
spot_img
spot_img

पुण्यात मुसळधार पाऊस ; पुढील दोन ते तीन दिवस पाऊस कायम

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पुणे शहरात पावसाने पुनरागमन केले आहे. सकाळपासून शहरात पावसाची संततधार असून, पुढील दोन ते तीन दिवस पाऊस कायम राहण्याची शक्यता आहे.

यंदा शहरात जुलैमध्ये कमी पाऊस पडला. गेल्या चार वर्षांतील नीचांकी पाऊस नोंदवला गेला. त्यानंतर ऑगस्टमध्येही पावसाने पाठ फिरवली. मात्र, आता विदर्भावर तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र वायव्येकडे सरकत आहे. तसेच आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र दक्षिण-ओडिशा किनाऱ्यावर निर्माण झाले आहे. ‘ऑफशोअर ट्रफ’ दक्षिण कोकण ते उत्तर केरळपर्यंत पसरलेला आहे. या कारणांमुळे राज्यात पावसासाठी पूरक स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून महाराष्ट्र, गुजरात, पश्चिम-मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, ओडिशा या भागांत मुसळधार ते अति मुसळधार पावसामुळे रेड आणि ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.

ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ अनुपम कश्यपी म्हणाले, पुण्याच्या घाट परिसरासह रायगड, रत्नागिरी, पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांसाठी तीन दिवसांसाठी रेड आणि ऑरेंज अलर्ट आहे. त्यामुळे या भागांना भेट देताना काळजी घेणे आवश्यक आहे. पुणे शहरात पुढील तीन दिवस ढगाळ वातावरण राहून हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!