spot_img
spot_img
spot_img

स्वातंत्र्य दिनी पॅरा शूटर निहाल सिंह ठरला गोल्डन बॉय !

एजीसी स्पोर्टस पॅरा खेलोत्सव पॅरा एडिशन २०२५ दिवस पाचवा

शबनम न्यूज | प्रतिनिधी

देशभरात एकीकडे स्वातंत्र्य दिनाचा जल्लोष सुरू असताना, दुसरीकडे पुण्यातील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे येथे भारताच्या पॅरा शूटरांनी अभिमानाची कामगिरी केली. त्यांनी एजीसी स्पोर्टस  पॅरा एडिशन २०२५ ची स्पर्धा गाजवली आणि स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व वाढवले.

शुक्रवारी बालेवाडी येथे P3 मिक्स्ड २५ मीटर पिस्तूल SH1 प्रकारातील अंतिम सामना खेळवण्यात आला. या सामन्यात राजस्थानच्या निहाल सिंह यांनी 28 गुणांसह गोल्ड मेडलवर नाव कोरले, तर हरियाणाच्या राहुल जाखर यांनी 27 गुणांसह रौप्यपदकावर नाव कोरले आणि आर्मीचे आमिर अहमद भट यांनी 25 गुणांसह कांस्यपदक जिंकले.

अंतिम सामना अत्यंत चुरशीचा राहिला.अखेरच्या दोन फेऱ्यांपर्यंत निहाल सिंह तिसऱ्या क्रमांकावर होते. मात्र, शेवटच्या फेरीत त्यांनी अप्रतिम नेमबाजी करत आघाडी घेतली आणि 28 गुणांसह सुवर्ण पदकाची कमाई केली. याशिवाय सुरुवातीपासून आम्रीचे आमिर भट प्रथम क्रमांकावर होते. परंतु, स्पर्धेच्या शेवटच्या दोन राऊंडमध्ये त्यांना ही लय कायम राखता आली नाही. त्यामुळे त्यांना प्रथम क्रमांकावरून तिसऱ्या स्थानावर यावे लागले आणि निहाल यांनी राहुल यांच्यात गोल्ड मेडलसाठी शर्यत झाली.

त्याचबरोबर या सामन्यात हरियाणाचे मनीष नारवाल (17 गुण) चौथ्या, आर्मीचे धर्मिंदर सिंह (13 गुण) पाचव्या, हरियाणाचे संदीप कुमार (11 गुण) सहाव्या, उत्तर प्रदेशचे आकाश (7 गुण) सातव्या आणि राजस्थानचे राहुल शर्मा (5 गुण) आठव्या स्थानावर राहिले. ११ ऑगस्ट पासून सुरु झालेल्या या स्पर्धेत देशातील अव्वल पॅरा शूटर्स सहभागी झाले असून, स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर झालेली ही रोमांचक लढत प्रेक्षकांसाठी प्रेरणादायी ठरली.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!