spot_img
spot_img
spot_img

अभिराज फॉउंडेशन”मध्ये दिव्यांग मुलांनी केला स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.

वाकड येथील”अभिराज फाउंडेशन ” या दिव्यांग मुलांच्या शाळे मध्ये 15 ऑगस्ट 79 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात पार पडला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून वुई टुगेदर फाउंडेशनचे अध्यक्ष मधुकर बच्चे, लायन्स क्लब ऑफ रहाटणी पुणे चे डायरेक्टर लायन अशोक बनसोडे, यशस्वी क्लासेसच्या संचालिका आदर्श शिक्षिका मंगला डोळे – सपकाळे अभिराज फाउंडेशनचे डायरेक्टर रमेश मुसूडगे, पालक संघ सदस्य सिद्धार्थ उघाडे सर, वुई टुगेदरचे सचिव जयंत कुलकर्णी, सलीम सय्यद,धनंजय मांडके ,पालक संघाचे सदस्य धनंजय बालवडकर मुख्याध्यापिका अनिता चव्हाण ,पालक, विद्यार्थी, शिक्षक, दादा ,मावशी उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले राष्ट्रगीत व ध्वजगीत झाले.संतोष कोळी या दिव्यांग विद्यार्थ्यांने अत्यन्त उत्कृष्ठ
प्रार्थना म्हटली शाळेच्या विद्यार्थ्यांनी यंग ऍथलिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली.यासाठी मुलांना क्रीडा शिक्षक विकास जगताप ऋषीकेश मुसूडगे, योगेश दादा याचे मार्गदर्शन मिळाले . मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते कुणाल, गोपी , मयूर, भरत,रविकांत या दादा यांचा सत्कार करण्यात आला
त्यानंतर प्रमुख पाहुणे मधुकर बच्चे, बनसोडे आणि मांगला डोळे यांनी मार्गदर्शन पर भाषणामध्ये विद्यार्थ्यांचे व शिक्षकाचे कौतुक केले व स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन स्मिता हांडे यांनी केले पाहुण्यांची ओळख वैशाली खेडेकर यांनी करून दिली केले सौ वंजारी यांनी आभार प्रदर्शन केले. त्यानंतर वुई टुगेदर फाउंडेशन व अन्य मान्यवरांनी मुलांना खाऊ आणलेला मान्यवरांनी
खाऊ वाटप केले. अशाप्रकारे अभिराज फाउंडेशन या दिव्यांग मुलांच्या शाळेत स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात व देशभक्ती च्या वातावरणात साजरा झाला.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!