spot_img
spot_img
spot_img

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन

शबनम न्यूज | प्रतिनिधी

देशाचे माजी पंतप्रधान आणि भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त पिंपरी- चिंचवड येथे त्यांना आदराने अभिवादन करण्यात आले. शहराध्यक्ष श्री.शत्रुघ्न काटे यांच्या नेतृत्वाखाली मोरवाडी येथील पक्ष कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात शहरातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी वाजपेयी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला. वाजपेयी यांच्या दूरदृष्टी, राजकीय नैतिकता आणि देशासाठी केलेल्या योगदानाबद्दल अनेक वक्त्यांनी आपले विचार मांडले.

या वेळी बोलताना शहराध्यक्ष श्री.शत्रुघ्न काटे यांनी वाजपेयी यांच्या कार्याचे महत्त्व सांगितले.ते म्हणाले, “अटलबिहारी वाजपेयी हे केवळ एक राजकारणी नव्हते, तर ते एक महान व्यक्तिमत्त्व, दूरदर्शी नेते आणि संवेदनशील कवी होते. त्यांनी आपल्या पंतप्रधानपदाच्या काळात देशाच्या विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. पोखरण अणुचाचणी, लाहोर बस यात्रा आणि सर्व शिक्षा अभियान यांसारख्या त्यांच्या अनेक निर्णयांनी भारताला जागतिक स्तरावर एक मजबूत राष्ट्र म्हणून ओळख मिळवून दिली.”

पुढे बोलताना काटे म्हणाले, “वाजपेयीजींनी नेहमीच राजकारणात मूल्यांची आणि नैतिकतेची जपवणूक केली. त्यांच्या ‘आम्ही सत्तेत असलो किंवा नसलो, तरी राष्ट्रहित हेच आमचे सर्वोच्च प्राधान्य असेल’ या विचारातून आपल्याला खूप काही शिकायला मिळते. त्यांच्यासारख्या नेत्याची आज देशाला नितांत गरज आहे. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करताना, त्यांच्या विचारांवर चालण्याची आणि देशाच्या प्रगतीसाठी योगदान देण्याची आपण शपथ घेऊया.”
कार्यक्रमाच्या शेवटी वाजपेयी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दोन मिनिटे मौन पाळून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

यावेळी ओबीसी मोर्चा प्रदेश सरचिटणीस मनोज ब्राह्मणकर,कार्याध्यक्ष युवा मोर्चा दीपक नागरगोजे, माणिकराव अहिरराव,संजय मांगवडेकर,शैलाताई मोडक, वैशालीताई खाडेय,राकेश नायर,नेताजी शिंदे,संजय परळीकर,सागर बिरारी तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!