संस्थेच्या संचालिका डॉक्टर सायली बारसे यांचे हस्ते ध्वजारोहण पार पडले
शबनम न्यूज | प्रतिनिधी
आदर्श शिक्षण संस्थेच्या प्रांगणात 79 वा स्वातंत्र्य दिन संचालिका सायली बारसे यांच्या हस्ते ध्वजारोहण होऊन मोठ्या उत्साहात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
पिंपरी चिंचवड मनपाचे स्वच्छता ब्रँड अँबेसिडर सुरेश डोळस यांनी मुलांशी संवाद साधला . तर भोसरी पररिसरातील RSSS चे पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना राखी कार्यक्रमातुन राखीचे महत्व व विश्वबंधुत्वाची भावना त्यांच्यामध्ये निर्माण केली.माजी सैनिक दिलीप गुरव दादा यांनी विद्यार्थ्यांना त्यांचे अनुभव सांगून विद्यार्थींमध्ये देशप्रेम निर्माण केले. यावेळी जिल्हा व राज्यस्तरावर पाचवी मधील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना पालकांसह सन्मानित करण्यात आले तसेच राज्यस्तरावरील मंथन परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी मनोगतातून देश प्रेम व्यक्त केले.
कार्यक्रमात दीपक टोणगे सरांनी शिस्तीचे प्रतिक असलेली सामुदायिक कवायत त्यांच्या मार्गदर्शनाखाली घेतली. आदर्श प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका तसेच माजी नगरसेविका प्रियांका बारसे यांनी विद्यार्थ्यांना शालेय जीवनातील शिस्त देशाच्या प्रगतीसाठी किती महत्त्वाची आहे हे विद्यार्थ्यांना समजून सांगितले. शिवव्याख्याते प्रमोद लाड यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले,
रफीक तांबोळी सरांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.