शबनम न्यूज | प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यासाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. पुढील काही तासांत जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
आज, पुढील ३ ते ४ तासांत काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. विशेषतः घाट परिसरात जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे आणि पुढील सूचनांचे पालन करावे, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.