spot_img
spot_img
spot_img

थेरगाव परिसरात तिरंगा रॅली

शबनम न्यूज | प्रतिनिधी

 स्वातंत्र्यदिनानिमित्त युवासेना पिंपरी-चिंचवडच्या वतीने थेरगाव येथे परिसरात भव्य तिरंगा रॅलीत काढण्यात आली. या रॅलीत मोठ्या संख्येने तरुण सहभागी झाले होते.

मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते तिरंगा हातात घेवून रॅलीला सुरूवात झाली.  थेरगाव येथील खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या जनसंपर्क कार्यालया पासुन या तिरंगा दूचाकी रॅलीस सुरूवात झाली.दत्तनगर- थेरगांवगावठाण – तापकीर चौक – काळेवाडी फाटा – १६ नंबर – गुजरनगर – गणेशनगर – डांगे चौक या मार्गाने बाईक रॅली काढण्यात आली. या रॅलीचे नेतृत्व पश्चिम महाराष्ट्र युवासेना सचिव विश्वजीत श्रीरंग बारणे यांनी केले. सुमारे ५०० दुचाकीवर कार्यकर्ते या रॅलीत सहभागी झाले होते.

वंदे मातरम, भारत माता की जय… अशा देशभक्तीच्या घोषणांनी थेरगाव परिसर दणाणून गेला. हातात तिरंगा, मनात उत्साह, आणि ओठांवर जयघोष — अशा उत्साहाच्या वातावरणात रॅली काढण्यात आली. राष्ट्रप्रेम, सामाजिक जबाबदारीची  ही तिरंगा बाईक रॅली स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवाला जणू नवचैतन्य देऊन गेली, अशी भावना विश्वजीत बारणे यांनी व्यक्त केली.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!