शेख बाबा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने रमजान निमित्त गरजू कुटुंबांना कपडे व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
सध्या मुस्लिम धर्मीयांचा रमजान हा पवित्र महिना सुरू आहे, या महिन्यात मुस्लिम समुदाय उपवास करत असतात, पिंपरी चिंचवड शहरातील शेख बाबा चॅरिटेबल ट्रस्ट वतीने दरवर्षीप्रमाणे विधवा अनाथ तसेच गरजू कुटुंबांना कपडे व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.सदर कार्यक्रम हा 22 मार्च रोजी यमुना नगर परिसरात संपन्न झाला.
शेख बाबा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने समीर आलम शेख यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमास पिंपरी चिंचवड शहरातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली यामध्ये राष्ट्रवादी पक्षाचे माजी नगरसेवक अजित गव्हाणे, शिवसेनेच्या उपनेत्या सुलभाताई उबाळे,, सुमनताई पवळे, माजी नगरसेविका योगिता नागरगोजे,माजी नगरसेविका कमल घोलप यांच्या सह अनेक मान्यवरांनी या कार्यक्रमास हजेरी लावली या कार्यक्रमात ट्रस्टचे अध्यक्ष आलम उर्फ बाबा शेख यांनी सर्वांचे स्वागत केले.
शेख बाबा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आलम उर्फ बाबा शेख यांनी यावेळी सांगितले की दरवर्षी शेख बाबा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने पिंपरी चिंचवड शहरातील अनेक गरजू कुटुंबांना कपडे व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येते. रमजान महिन्यात गरीब कुटुंबातही रमजान ईद मोठ्या आनंदाने साजरी व्हावी हा त्यामागचा उद्देश आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ट्रस्टचे अश्रफ अन्वर अली शेख, जमीर शेख, अखिल शेख ,आमिर खान, रजा खान, जिलानी जमादार, नईम जमादार, आश्रफ शेख, जाफर शेख, साहिल गांगुर्डे यांनी परिश्रम घेतले.
तर ट्रस्टचे कार्यवाहक म्हणून आदिकेत वाघमारे, वैशाली पवार, सोहेल शेख, मनोज शेलार, दत्ता कालेकर यांनी काम पाहिले.