शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपळे सौदागर येथे उन्नती सोशल फाउंडेशन आणि इंडो ऍथलेटिक सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तिरंगा सन्मानार्थ सायकल रॅली २०२५ उत्साहात संपन्न झाली. “Pedal for Green India” या घोषवाक्यासह हरित भारताचा संदेश देत सकाळी ७ वाजता उन्नती सोशल फाउंडेशन कार्यालयापासून रॅलीला सुरुवात झाली. मुकाई चौक, रावेतपर्यंतचा २० किमीचा प्रवास पूर्ण करून पुन्हा उन्नती सोशल फाउंडेशन येथे रॅलीचा समारोप झाला.
या उपक्रमात सहभागी सर्व सायकलस्वारांना टी-शर्ट, मेडल, प्रमाणपत्र, बीआयबी व जवळजवळ 1,50,000 झाडांचे बिया वाटून नागरिकांना ते लावावे असे सांगितले व तसेच अल्पोपहाराची सुविधा देण्यात आली. लकी ड्रॉद्वारे तीन सायकल आणि पाच हेल्मेटची बक्षिसे देण्यात आली. या माध्यमातून स्वातंत्र्य दिनाच्या उत्सवाला पर्यावरण संवर्धन व आरोग्याचा संदेश जोडला गेला.
प्रास्ताविक करताना डॉ. सौ. कुंदाताई भिसे म्हणाल्या, “स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित ही सायकल रॅली केवळ तिरंग्याचा सन्मान करण्यासाठीच नव्हे, तर पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यासाठी आहे. युवकांमध्ये आरोग्यदायी जीवनशैली आणि देशभक्तीची जाणीव निर्माण होणे हेच आमचे उद्दिष्ट आहे.”
मनोगत व्यक्त करताना आमदार शंकर भाऊ जगताप म्हणाले, “उन्नती सोशल फाउंडेशनने घेतलेला हा उपक्रम स्तुत्य आहे. देशभक्ती, पर्यावरण संवर्धन आणि आरोग्य या तिन्ही गोष्टींचा सुंदर संगम या रॅलीत दिसून आला. अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.”
या कार्यक्रमास चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर भाऊ जगताप, माजी आमदार अश्विनीताई लक्ष्मण जगताप, भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे, तसेच उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सौ. कुंदाताई संजय भिसे , संस्थापक संजय भिसे , ऑर्डनरी लेफनंट सुबेदार मेजर दत्ता डांगे साहेब , नायब सुबेदार अनिल हारक , हवालदार संदीप पावले , सामाजिक कार्यकर्ते संदेश काटे , भानुदास काटे पाटील , उद्योजक सोमनाथशेठ काटे , बाळासाहेब काटे , प्रकाशशेठ झिंजुर्डे , सरचिटणीस भाजपा ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश मनोज ब्राह्मणकर , कैलास कुंजीर , दीपक गांगुर्डे , अतुल पाटील ,उद्योजक राजू भिसे , आनंद हास्य क्लबच्या मीनाक्षीताई देवतारे , राजेंद्र जयस्वाल , ऑल सीनियर सिटीजन असोसिएशनचे सुभाषचंद्र पवार , आंतरराष्ट्रीय कबड्डी पंच दत्तात्रय झिंजुर्डे , डॉ.दीपक जोशी , संदेश काटे , उन्नती सखी मंच सदस्या यांच्यासह विठाई वाचनालय चे सभासद , आनंद हास्य क्लब चे सभासद , ऑल सिनियर सिटीजन्स असोसिएशन चे सर्व सभासद तरुण वर्ग आणि पिंपळे सौदागर परिसरातील देशप्रेमी नागरिक बंधू-भगिनी आदी उपस्थित होते.