शबनम न्यूज : प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड :आज आपल्या देशाचा स्वतंत्र दिन 15 ऑगस्ट संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. याच पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरात श्री संतोष प्रभाकर म्हस्के फाउंडेशन व सौ. पुनम संतोष म्हस्के यांच्या संकल्पनेतून स्वतंत्र दिनानिमित्त तथा पवित्र श्रावण निमित्ताने पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक 16 मध्ये विकास नगर किवळे, रावेत, मामुर्डी, शिंदे वस्ती येथील नागरिकांना पालेभाज्यांची गड्डी मोफत देण्यात आली
यामध्ये 1000 पालेभाज्यांची गड्डी मोफत वाटप करण्यात आली. सदर उल्लेखनीय उपक्रम विकास नगर रिक्षा स्टॅन्ड येथे आयोजित करण्यात आला. यावेळी या उपक्रमाचा असंख्य नागरिकांनी लाभ घेतला. पालेभाज्या हे आपल्या आरोग्याला लाभदायक असतात. पालेभाज्यांचा आहार प्रत्येकाने करायलाच हवा या उद्देशाने हा अनोखा उपक्रम सौ. पुनम संतोष म्हस्के व संतोष प्रभाकर म्हस्के यांच्या वतीने राबविण्यात आला. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
यावेळी या उपक्रमात अनेक मान्यवरांनी हजेरी लावली.