spot_img
spot_img
spot_img

रमजान सय्यद यांच्या वतीने स्वतंत्र्य दिना निमित्त शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप

 

शबनम न्यूज : प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादी पक्षाचे सरचिटणीस रमजान सय्यद यांच्या वतीने 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त शालेय मुलांना खाऊ वाटप करण्यात आले .वाकड भूमकर चौक येथील आबाजी भूमकर शाळा येथे आज ध्वजारोहण . कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. राष्ट्रध्वजास मानवंदना देऊन स्वतंत्र दिन साजरा करण्यात आला.

यावेळी माजी नगरसेवक राहुल कलाटे स्वीकृत सदस्य मोहन दादा भूमकर बाळासाहेब विनोद आदी मान्यवर उपस्थित होते.

रमजान सय्यद यांच्या वतीने दरवर्षी 15 ऑगस्ट व 26 जानेवारी रोजी शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात येते तसेच त्यांच्या वतीने वर्षभरात अनेक सामाजिक कामे होत असतात .या समाजकार्याचे एक भाग म्हणून आज त्यांनी स्वतंत्र दिनानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करत आजचा स्वतंत्र दिन लहान मुलांसाठी आनंदाचा ठरेल यासाठी हा आनंददायी उपक्रम राबविला असल्याची भावना रमजान सय्यद यांनी यावेळी व्यक्त केली.

यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सुनंदा कोरडे यांच्यासह शिक्षिका सुरेखा गोडंबी व विद्यार्थी पालक शाळेचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!