शबनम न्यूज : प्रतिनिधी
देवकर पथ, पिंपळे गुरव येथील एम .जी देवकर एज्युकेशनल ट्रस्ट संचलित ब्रिलियंट स्टार प्री स्कूलमध्ये स्वतंत्र भारताचा 79 वा स्वातंत्र्य दिन सोहळा चिंचवड विधानसभेचे कार्यक्षम आमदार मा. शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात साजरा करण्यात आला . भारतीय सैन्य दलातील नायब सुभेदार माननीय मेजर विकास खरात आणि नायक अक्षय गोरडे यांच्या हस्ते सुरुवातीला ध्वजारोहन झाले .यावेळी केंद्रीय विद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य मा. वसंत जाधव सर व सामाजिक कार्यकर्ते श्री बाळासाहेबअण्णा देवकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते .ध्वजाला आणि या सर्व मान्यवरांना शाळेतील विद्यार्थ्यांनी परेड करून मानवंदना दिली .
यावेळी शाळेतील मुला मुलींनी देशभक्तीपर भाषणे ,फिर भी दिल है हिंदुस्तानी आधी देशभक्तीपरगीते सादर करून करून उपस्थितांचे मने जिंकली .पालकांच्या वतीने पूजा अहिरे व गायत्री थोरात आणि शिक्षकांच्या वतीने यामिनी सूर्यवंशी मॅडम यांनी आजच्या या स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व पटवून सांगितले .
केंद्रीय विद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य मा . श्री वसंत जाधव सर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या वीरांचे स्मरण करून दिले त्यांचे आचार विचार आपण अंगीकारले पाहिजे हेच खरे स्वातंत्र्य असे सांगितले .भारतीय सैन्य दलातील नायब सुभेदार माननीय श्री विकास खरात साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त करताना स्वातंत्र्याचे महत्त्व सांगितले त्याचबरोबर अलीकडच्या काळामध्ये सैन्य दलात भरती होण्यासाठी आपण आपल्या मुलांना प्रोत्साहित करावे जेणेकरून आपली मुले देशासाठी चांगली कामे करतील आणि आपल्या राज्याचा देशाचा नावलौकिक वाढवतील .यावेळी शाळेच्या वतीने नायक सुभेदार विकास खरात साहेब आणि नायक अक्षय गोरडे व वसंत जाधव सर आणि भारतीय पोस्ट खात्याचे दिलीप जगदाळे, जयदेव थोरात ,मयूर बोराडे ,अमित मेहरावत या सर्वांचा सन्मान संस्थापक नवनाथ देवकर, बाळासाहेब देवकर, देवदास देवकर, अनिल देवकर, शंकरराव मुळीक, शांताबाई देवकर, सरस्वती देवकर यांच्या हस्ते करण्यात आला .
या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर शाळेचा पालक वर्ग विद्यार्थी आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते .या स्वातंत्र्य दिन सोहळ्याच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल वाघ मॅडम ने केले तर आभार प्रदर्शन वंदना देवकर मॅडम यांनी केले शेवटी वंदे मातरम ने या कार्यक्रमाची सांगता झाली .