पिंपरी चिंचवड शहरातील शिवसेनेच्या महिला शहर प्रमुख सौ.सरिता ताई साने यांच्यावतीने निगडी प्राधिकरण येथील छत्रपती संभाजी महाराज चौक येथे शनिवार दिनांक 16 ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता दहीहंडी उत्सव मोठ्या दिमाखात व उत्साहात संपन्न होत आहे.
शिवगर्जना प्रतिष्ठान व सुवर्णयुग मित्र मंडळ ट्रस्ट आयोजित या भव्य दहीहंडी उत्सवाचे प्रमुख आकर्षण अभिनेत्री संजना काळे (मराठी मालिका पारू फेम) व अभिनेत्री साक्षी गांधी (मराठी मालिका सहकुटुंब सहपरिवार व कोण होतीस तू काय झालीस तू फेम)असणार आहे.
सौ. सरिताताई साने यांच्यासह ऋषिकेश साने व ओंकार पाटोळे यांच्या वतीने सदर दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे या दहीहंडीत जिंकून येणाऱ्या गोविंदा पथकाला एक लाख 11 हजार एकशे अकरा रुपये पारितोषिक देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे.
तरी सदर भव्य दहीहंडी उत्सवात निगडी प्राधिकरण परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत दहीहंडी उत्सवाचा आनंद लुटावा असे आवाहन सौ. सरिता ताई साने, ऋषिकेश साने, व ओंकार पाटोळे तसेच शिवगर्जना प्रतिष्ठान व सुवर्णयुग मित्र मंडळ ट्रस्ट वतीने करण्यात आले आहे.