आज सांयकाळी पिंपरीत होणार भव्य नागरी सत्कार ….
पिंपरी (प्रतिनिधी) :- विधानसभेचे उपाध्यक्ष मा.अण्णा बनसोडे यांचा पिंपरी चिंचवड पहिला दौरा आज मुंबई मंत्रालयात येथून सुरू होत असून संध्याकाळी ०६ वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथे भव्य नागरी सत्कार सोहळा संपन्न होणार असल्याचे प्रसिध्दी पत्रक विधानभवन कार्यालयाने प्रसिद्ध केले आहे.
विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांची विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून नुकतीच बिनविरोध निवड झाली आहे. विधानभवन कार्यालयाने उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचा मुंबई ते पिंपरी चिंचवड दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे.
हा दौरा आज शनिवार दिनांक २९ मार्च २०२५ रोजी सकाळी सुरू होत असून महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय विधानभवन ते गोवंडी प्रयाण स.१०.३० वाजता,गोवंडी येथे भव्य स्वागत समारंभ स.११.०० वा.,वाशी येथे स्वागत समारंभ स.११.३० वा.,खारघर येथे स्वागत समारंभ, स. १२.०० वा., तळोजा फाटा खारघर येथे स्वागत समारंभ स. १२.३० वा., रोड पाली सीतामाई मंगल निवास येथे स्वागत समारंभ दुपारी.०१.०० वा., खालापूर टोल नाका येथे स्वागत समारंभ दुपारी.०२.०० वा., कामशेत येथे स्वागत समारंभ दु.०२.३० वा., सोमाटणे फाटा येथे स्वागत समारंभ दु.०३.०० वा., मुकाई चौक किवळे येथे भव्य स्वागत समारंभ सांय,०४.३० वाजता, निगडी भक्ति शक्ती स्मारक आणि अण्णाभाऊ साठे यांना पुष्पहार अर्पण, खंडोबा मंदिर आकुर्डी येथे दैवत खंडोबा यांना पुष्पहार अर्पण, चिंचवड स्टेशन काकडे रेसिडेन्सी येथे भव्य स्वागत समारंभ, चिंचवड स्टेशन लहुजी वस्ताद यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण,पिंपरी चिंचवड महानगरपालिका अण्णासाहेब मगर पुतळ्यास पुष्पहार अर्पण, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण, डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यामागील मैदानात उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचा जाहीर नागरी सत्कार समारंभ सांयकाळी ६ वाजता संपन्न होणार आहे.या ठिकाणीच सर्वांचे सत्कार स्वीकारले जाणार आहेत.
डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकातील सत्कार समारंभासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट)पक्षा सह महायुतिचे सर्व पदाधिकारी,आजी माजी नगरसेवक,पक्षाचे कार्यकर्ते,उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे चाहते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.