पिंपरी चिंचवड शहरातील मोशी परिसरातील माजी नगरसेवक वसंत बोराटे यांच्या वतीने साईनाथ मित्र मंडळ च्या भव्य दिव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन शनिवार दिनांक 16 ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता करण्यात आले आहे. यंदा हा उत्सव मोठ्या प्रमाणात व जल्लोषात रंगणार आहे. मोशीत दहीहंडीचा थरार रंगणार असून या उत्सवाचे यंदाचे प्रमुख आकर्षण हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध नायिका कीर्ती खरबंदा च्या उपस्थितीत दहीहंडी उत्सव संपन्न होत आहे. तसेच याप्रसंगी मराठी चित्रपट मुरब्बा फेम निशा बोरुले व सुंदरा मनामध्ये भरली फेम पूजा पुरंदरे यांचीही हजेरी असणार आहे.
मागील 17 वर्षापासून वसंत शेठ बोराटे हे सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नगरसेवक पदावर कार्यरत असताना आदर्श नगरसेवक कसा असावा हे आपल्या कार्य कर्तृत्वाने दाखवून दिले आहे. प्रभागातील अनेक समस्या सोडविण्याचे काम वसंत बोराटे यांनी केले आहे. आपल्या प्रभागातील विकासासाठी नेहमीच तत्पर राहणारे वसंत बोराटे आपला हाच सामाजिक कार्याचा वसा पुढे चालवत असताना त्यांच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दहीहंडी हा उत्सव मोठ्या उत्साहात व जल्लोषात संपन्न होत आहे.
मोशी मधील अंशुल कॉसमॉस ग्राउंड वैशाली स्वीट होम जवळ, देहू रास्ता , मोशी येथे हा दहीहंडीचा थरार रंगणार असून मोशीतील नागरिकांनी दहीहंडीचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवावी असे आवाहन आयोजक माजी नगरसेवक वसंत बोराटे व साईनाथ मित्र मंडळ वतीने करण्यात यांनी केले आहे.