शबनम न्यूज | प्रतिनिधी
संतश्रेष्ठ श्री. ज्ञानेश्वर महाराज यांच्या सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी (७५० वी) जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व शाळा-महाविद्यालयांत “पसायदान पठण” आयोजित करण्यात आले. या अनुषंगाने महात्मा फुले महाविद्यालय, पिंपरी येथे राष्ट्रीय छात्र सेना (NCC) व राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागांच्या संयुक्त विद्यमाने सामूहिक “पसायदान पठण” झाले.
या प्रसंगी प्राचार्य प्रा. डॉ. पांडुरंग भोसले, एनएसएस कार्यक्रम अधिकारी श्री. गणेश भांगरे, एनसीसी ए.एन.ओ. लेफ्ट. प्रसाद बाठे, एनएसएस कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रतिमा कदम तसेच तिन्ही विद्याशाखांचे उपप्राचार्य प्रा. डॉ. सुहास निंबाळकर, प्रा. डॉ. संगीता आहिवळे, प्रा. डॉ. कामायनी सुर्वे आणि कनिष्ठ महाविद्यालय पर्यवेक्षक सौ. रुपाली जाधव उपस्थित होते.
या उपक्रमात महाविद्यालयातील शिक्षकवर्ग, प्रशासकीय कर्मचारी तसेच वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचे पसायदान हे सार्वकालिक गीत सामूहिक पठणातून अनुभवताना भक्तिभाव, एकात्मता व सांस्कृतिक मूल्यांचे संवर्धन घडून आले.