शबनम न्यूज | प्रतिनिधी
जिल्हा जळगाव ता. जामनेर या ठिकाणी सुलेमान खान या युवकाची भाजप आणि गिरीश महाजन समर्थक शिवप्रतिष्ठानच्या दहशतवादी गुंडानी हत्या केली. सुलेमान खानला बर्बर मारहाण केली त्याचे कपडे काढण्यात आले, पायाचे नख उपटले गेले. सरपंच संतोष देशमुख यांना ज्या पद्धतीने मारले तसेच सुलेमानला मारण्यात आले. हल्लेखोर भाजप आणि शिवप्रतिष्ठान या संघटनेशी संबंधित आहे. मुख्य आरोपी पवन बावस्कर व अन्य आरोपी अद्याप फरारी आहे याचा आका कोण? कुणाच्या इशाऱ्यावरून सुलेमान खानची हत्या झाली. सुलेमान खान यांची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसताना एका निरपराध मुस्लिम तरुणाचा जीव घेण्यासाठी कुणी प्रोत्साहित केले या सर्व बाबींचा खुलासा होणे गरजेचे आहे.
गेल्या 2023 पासून आमदार गिरीश महाजन यांनी त्या ठिकाणी शिवप्रतिष्ठानचे मनोहर भिडे यांचे अनेक कार्यक्रम घेऊन जामनेर या ठिकाणी धार्मिक तणाव निर्माण केला होता. त्याचाच परिणाम असा झालं की दोन दिवसांपूर्वी सुलेमान खान एका हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी व पोलीस भरतीच्या प्रशिक्षण फॉर्म भरण्यासाठी काफेमध्ये बसला होता. काफे चालकाच्या मालकांनी सुलेमान खानच्या मारेकऱ्यांना तुरंत फोन लावून सांगितले की या ठिकाणी एक मुस्लिम मुलगा हिंदू मुली सोबत सोबत चहा पेयत बसला अशी माहिती दिली. गिरीश महाजन यांचे कट्टर समर्थक पवन बावस्कर व त्याचे काही साथीदार तिथे आले आणि सुलेमान खान या तरुण 20 वर्षाच्या मुलाला जबर मारहाण करून तथाकथित लव जिहाद खोटा आरोप लावून त्याची हत्या केली. सदरची हत्या हे माणुसकीला काळीमा फासणारी असून सदर घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो. सुलेमान खानच्या हत्यातील सर्व आरोपींना ताबडतोब अटक करून कठोर शिक्षा व्हावी याकरिता आज पुणे कलेक्टर ऑफिस या ठिकाणी ठिय्या आंदोलन करण्यात आले.
मूलनिवासी मुस्लिम मंचाचे अध्यक्ष अंजुम इनामदार व मास मोमेंट संघटनाचे भाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात. बहुजन समाज पक्षाचे नेते दिलीप कुसाळे, एडवोकेट समीर शेख, ख्रिश्चन महासंघ चे अध्यक्ष राजन नायर, दीपा विलियम, इंदुताई कुचीकर, इब्राहिम खान, असलम सय्यद, फिरोज मुल्ला, सलीम मौला पटेल, जुबेर बाबू शेख, सुलतान शहा, इब्राहिम यवतमाळवाला, मोईन शेख, अजीम बाबुमिया शेख, गणेश बावणे, राहुल सुरवडे इत्यादी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
याप्रसंगी पुणे जिल्हा अधिकारी मा. जितेंद्र दुडी यांना निवेदन देण्यात आले.