spot_img
spot_img
spot_img

युवा नेते निलेश बोराटे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा

पिंपरी चिंचवड शहरातील मोशी परिसरातील भारतीय जनता पक्षाचे युवा नेते निलेश बोराटे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा झाला यामध्ये प्रामुख्याने निलेश बोराटे सोशल फाउंडेशन व लक्ष फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले,, पाचवी ,दहावी, बारावी, बीए ,बी कॉम, एम कॉम, एमबीए, एमसीए, एम एस डब्ल्यू, एम सी एस ,बी एस सी ,ग्रॅज्युएशन ,पोस्ट ग्रॅज्युएशन ,आयटीआय ,सर्व विषय डिप्लोमा, बीई ,मेकॅनिकल, बीसीए, एमसीए ,बी टेक ,इंजिनिअर व इतर तसेच ज्यांचे शिक्षण अत्यंत कमी आहे अशा हि बेरोजगार युवक युवती यांच्यासाठी हे नोकरी महोत्सव यशस्वीपणे संपन्न झाले. देहू रस्ता मोशी मध्ये संपन्न झालेल्या या नोकरी महोत्सवात अनेक युवक युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या, अनेकांनी नोकरी मिळाल्या बद्दल निलेश बोराटे यांचे आभार व्यक्त केले ,या नोकरी महोत्सवात भव्य दिव्य असे आयोजन करत एकूण 70 व्यावसायिक कंपन्यांनी सहभाग घेतला व शेकडोच्या संख्येने बेरोजगारांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या

निलेश बोराटे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या रक्तदान शिबिरात अनेक युवकांनी आपले रक्तदान केले, रक्तदान सर्वश्रेष्ठदान असे म्हणतात अनेकांचे आयुष्य वाचविण्यासाठी रक्तदान करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे या दृष्टिकोनातून निलेश बराटे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

झाडे लावा झाडे जगवा असा संदेश देणारा उपक्रम निलेश बोराटे यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आला भव्य असे वृक्षारोपण कार्यक्रम या निमित्ताने आयोजित करण्यात आले या वेळी कार्तिक दादा लांडगे यांच्या सह अनेक मान्यवरांनि हजेरी लावली सह अनेक मान्यवरांनी हजेरी लावली

निलेश बोराटे यांच्या वाढदिवसानिमित्त मोशी परिसरातील सफाई कामगारांचा सन्मान करण्यात आला, सफाई कामगारांमुळेच आपला परिसर स्वच्छ व निरोगी असतो त्यामुळे या सफाई कामगारांचा सन्मान करणे आपले कर्तव्य आहे या उपक्रमात मोशी परिसरात सफाई कामगार यांना भेटवस्तू देत *निलेश बोराटे यांनी सन्मान आणि सत्कार केला.

निलेश बोराटे यांच्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नागरिकांचा ही सन्मान मोठ्या उत्साहात करण्यात आला अनेक जेष्ठ नागरिकांचा सन्मान निलेश बोराटे यांनी केला

निलेश बोराटे यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक मान्यवरांनी हजेरी लावली व निलेश बोराटे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तसेच निलेश बोराटे यांनी आयोजित केलेले उपक्रम व करत असलेल्या सामाजिक कामाचे अनेकांनी कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या,

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!