माजी नगरसेवक सुरेश भोईर यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 18 मधील महिलांनी मुख्यमंत्र्यांना पाठविले 1000 पेक्षा जास्त राख्या
पिंपरी चिंचवड शहरातील भाजप पक्षाचे माजी नगरसेवक सुरेश भोईर यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून एक हजारापेक्षा जास्त राख्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आले आहेत.
माजी नगरसेवक सुरेश भोईर यांच्या पुढाकाराने प्रभाग क्रमांक 18 मधील महिलांनी हा अनोखा रक्षाबंधनाचा उपक्रम राबविला.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांच्या सन्मानासाठी आणि सुरक्षिततेसाठी केलेल्या प्रभावी उपाययोजनाबद्दल असंख्य महिलांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले. तसेच आगामी काळात महाराष्ट्र राज्यातील महिलांना एका बहिणीला जसे भावाकडून संरक्षण मिळते, आधार मिळतो तसाच आधार व संरक्षण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील महिलांना दिला आहे व ते पुढेही असेच महिलांसाठी चांगल्या सोयी सुविधा व उपाययोजना आरोग्यदायक योजना राबवतील अशी आशा अनेक महिलांनी व्यक्त करत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाची प्रशंसा केली आहे.
माजी नगरसेवक सुरेश भोईर यांच्या माध्यमातून सदर उपक्रम राबविण्यात आले तसेच एका बंद लिफाफ्यात 1000 पेक्षा अधिक राख्या देवेंद्र फडणवीस यांना पाठवून हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला.