spot_img
spot_img
spot_img

‘घरो घरी तिरंगा’ मोहिमेतर्गत साधला देशभक्ती व महिला सबलीकरणाचा सेतू!

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या समाज विकास विभागाने घरो घरी तिरंगा’ मोहिमेतर्गत देशभक्ती आणि महिला सबलीकरणाचा सुरेख संगम साधला आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंहअतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटीलउपायुक्त ममता शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या विभागाने शहरातील आठही क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या ४० महिला बचत गटांना एकत्र आणून त्यांच्या माध्यमातून तिरंगा झेंड्यांची निर्मिती केली. त्यानंतर हे झेंडे शहरातील प्रमुख चौकबाजारपेठसांस्कृतिक केंद्रेशाळा परिसर आदी ठिकाणी लावलेल्या प्रदर्शनातून विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

महापालिकेच्या समाज विकास विभागाने यासाठी बचत गटांना आवश्यक वस्तूमार्गदर्शन व विक्रीसाठी जागा उपलब्ध करून दिली. प्रत्येक गटाने आपल्या परिसरातील ग्राहकांशी थेट संवाद साधत विक्री केली. नागरिकांनीही बचत गटांच्या या प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद देऊन तिरंगा झेंड्यासह इतर वस्तू खरेदी करण्याला प्राधान्य दिले. या संपूर्ण उपक्रमामुळे घरो घरी तिरंगा’ मोहिमेला स्थानिक स्तरावर नवा आयाम मिळाला आहे. तसेच महिला बचत गटांचा आत्मविश्वासकार्यक्षमता आणि स्वावलंबनाची वाट अधिक बळकट झाली असून नागरिक आणि प्रशासन यांच्यातील सहभागाची भावना दृढ झाली आहे.

भोसरी येथील प्रदर्शनाला अतिरिक्त आयुक्तांची भेट

भोसरी येथे घरो घरी तिरंगा’ मोहिमेतर्गत आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमस्थळी समाज विकास विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महिला बचत गटांच्या तिरंगा विक्री प्रदर्शन केंद्राला अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी भेट देऊन बचत गटांच्या महिलांशी संवाद साधला. या प्रदर्शनात वरद लक्ष्मी महिला बचत गटस्वावलंबी महिला बचत गटमहालक्ष्मी महिला बचत गटप्रगती महिला बचत गट आकुर्डीगौरी गणपती महिला बचत गटश्री स्वामी चैतन्य महिला बचत गटसर्वज्ञ महिला बचत गट सहभागी झाले होते.

या बचत गटांच्या महिलांनी झेंड्यांची गुणवत्तारंगसंगती आणि निर्मिती प्रक्रियेबाबत अतिरिक्त आयुक्त सांडभोर यांना सविस्तर माहिती दिली. यावेळी अतिरिक्त आयुक्त सांडभोर म्हणाल्या, “या उपक्रमामुळे महिला बचत गटांना आर्थिक लाभ तर झालाशिवाय त्यांच्या कल्पकतेला संधीही मिळाली. स्थानिक पातळीवर झेंड्यांची निर्मिती केल्यामुळे या महिलांना घरबसल्या रोजगार मिळून त्यांचे आत्मनिर्भरतेकडे पाऊल अधिक भक्कम झाले आहे.

याप्रसंगी उपायुक्त अण्णा बोदडेमुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडेविशेष अधिकारी किरण गायकवाडसहाय्यक आयुक्त अतुल पाटीलक्षेत्रीय अधिकारी तानाजी नरळेसमाज विकास विभागाचे प्रशासन अधिकारी परशुराम वाघमोडेसहाय्यक समाज विकास अधिकारी संगीता चोरघेसमाजसेवक विशाल शेडगेसंगीता इंद्राक्षेसमुहसंघटक जयश्री पवळेदत्ता गोयकर उपस्थित होते.

महिला बचत गट हे शहरातील सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाचे शक्तीस्थान आहेत. घरो घरी तिरंगा’ या मोहिमेतर्गत तिरंगा झेंड्याची निर्मिती करून त्याची विक्री केल्यामुळे महिलांना रोजगारआत्मविश्वास आणि एकत्रितपणे काम करण्याचा आनंद मिळाला आहे. पुढील काळातही पिंपरी चिंचवड महापालिकेच्या समाज विकास विभागामार्फत असेच उपक्रम राबवून महिला सक्षमीकरणाच्या दिशेने काम सुरू राहील.

– ममता शिंदेउपायुक्तपिंपरी चिंचवड महापालिका

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!