spot_img
spot_img
spot_img

शहर भाजप वतीने आयोजित तिरंगा रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

शबनम न्यूज | प्रतिनिधी

देशाच्या सीमेवर डोळ्यात तेल घालून अहोरात्र पहारा देणार्‍या सैनादलाच्या समर्थनार्थ व भारतीय जवानांचे मनोबल वाढविण्यासाठी भाजपा भोसरी मंडलाच्या वतीने आयोजित तिरंगा रॅली मोठ्या जोशपूर्ण उत्साहात पार पडली.

आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली कामगार नेते सचिन भैय्या लांडगे, मा. नगरसेवक सागर गवळी, भाजपा सरचिटणीस कविताताई भोंगाळे पाटील, भोसरी मंडलध्यक्ष अमोल डोळस, युवा नेते प्रज्योत फुगे यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रॅलीला सुरवात होवून आळंदी रोड मार्गे दिघी रोडवरुन पीएमटी चौक येथे रॅलीची सांगता झाली. या तिरंगा रॅलीमध्ये भोसरी येथील मंजुरीबाई विद्यालय, श्रमजीवी विद्यालय, ज्ञानसागर विद्यालय, संत ज्ञानेश्वर विद्यालय, न्यू इंग्लिश स्कूल, जिजामाता विद्यालय, एसपीजी विद्यालय, प्रियदर्शनी विद्यालय, गायत्री इंग्लिश मीडियम स्कूल आदी विद्यालयातील जवळपास तीन हजारहून अधिक विद्यार्थी व शेकडो नागरिक हातात तिरंगा ध्वज घेवून भारत मातेच्या विजयाच्या घोषणा देत सहभागी झाले होते यामुळे संपूर्ण भोसरी नगरी देशप्रेमाच्या वातावरणाने न्हावून निघाली होती.

यावेळी भाजपा माथाडी जनरल कामगार संघ पुणे जिल्हाध्यक्ष विजय भोसुरे, भाजपा जेष्ठ कार्यकर्ते रविंद्र नांदूरकर, संदीप पंडित, प्रमोद परदेशी, सुशांतराजे पवार, सुजाताताई लोंढे, मंडलध्यक्षा रोहिणीताई मांढरे, गायत्री तळेकर, भाजपा प्रभाग क्रमांक पाच महिला अध्यक्षा सौ. स्वातीताई शिर्के, मनीषा गंगणे, सौ.दिपाली डोळस, सौ ज्योती मराठे आदी मान्यवर उपस्थित होते.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!