शबनम न्यूज | प्रतिनिधी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य हे संपूर्ण भारतासाठी प्रेरणादायी ठरले आहे. त्यांनी हिंदू मंदिरांचा जीर्णोद्धार केला, उत्तम प्रशासन दिले आणि एक न्यायप्रिय शासिका म्हणून आदर्श निर्माण केला. त्यांच्या कार्याची आठवण कायमस्वरूपी राहावी यासाठी भोसरी विधानसभा मतदारसंघात त्यांचे भव्य पूर्णाकृती स्मारक उभारण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रीय खेळाडू अरुण सर पाडुळे यांनी केली आहे.
पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणावर धनगर समाज वास्तव्यास असून, या समाजाच्या भावना आणि पुण्यश्लोक मातेविषयी असलेला आदर लक्षात घेता, स्मारकाभोवती त्यांच्या जीवनप्रवासावर आधारित शिल्पाकृती असाव्यात, अशीही मागणी करण्यात आली आहे. यामुळे पुढील पिढीला अहिल्यादेवींच्या कार्याची जाणीव राहील आणि त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेता येईल.
या संदर्भात अरुण सर पाडुळे यांनी आज भोसरीचे आमदार आणि हिंदुत्ववादी नेते महेश किसनराव लांडगे यांना निवेदन सादर करून स्मारक उभारणीबाबत तात्काळ पावले उचलावीत, अशी विनंती केली आहे.