शबनम न्यूज | प्रतिनिधी
महापालिकेच्या वतीने आज पार पडलेल्या जनसंवाद सभेत एकूण ६२ तक्रार वजा सूचना प्राप्त झाल्या आहे.
आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या आदेशानुसार पिंपरी चिंचवड शहरातील नागरिक आणि महापालिका प्रशासन यांच्यात सुसंवाद राखण्यासाठी महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांत महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येते. त्यानुषंगाने आज ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह या आठ क्षेत्रीय कार्यालयात आज जनसंवाद सभा पार पडली. यावेळी नेमून दिलेल्या समन्वय अधिकाऱ्यांनी जनसंवाद सभेचे अध्यक्षपद भूषविले.
आज पार पडलेल्या जनसंवाद सभेत अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह या क्षेत्रीय कार्यालयात अनुक्रमे ६, ७, ८, ७, ३, १०, १ आणि २० अशा एकूण ६२ तक्रारी वजा सूचना नागरिकांनी उपस्थित राहून मांडल्या.
यावेळी नागरिकांनी शहरातील प्रत्येक भागात सुरु असलेल्या स्थापत्य विषयक कामांमुळे नागरिकांना फुटपाथवरून होणारा त्रास, मेट्रो कामामुळे वाहतुकीला होणारा अडथळा, शहरात ठिकठिकाणी पडणारा कचरा,खड्डे, जेष्ठ नागरिक मंचच्या बसण्याची तुटलेल्या खुर्च्या, उद्यानांमधील मोडकळीस आलेली खेळणी, मार्केटच्या ठिकाणी वाहनाची वाढलेली गर्दी, महिला स्वच्छता गृहांची कमतरता आदी तक्रार वजा सूचना जनसंवाद सभेत नागरिकांनी उपस्थित राहून मांडल्या.