spot_img
spot_img
spot_img

पिंपळे सौदागर येथे ‘समरसत रक्षाबंधन’ उत्साहात साजरे

समाजातील सर्वच घटकांकडून बंधुता, स्नेह आणि ऐक्याचा संदेश – डाॅ. कुंदाताई भिसे 

शबनम न्यूज | प्रतिनिधी

उन्नति सोशल फाऊंडेशनच्या आवारात रविवार, दि. १० ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १० वाजता “समरसत रक्षाबंधन” कार्यक्रम उत्साहात पार पडला.

सकल पिंपळे सौदागर बंधू आणि भगिनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमात समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन बंधुता, स्नेह आणि ऐक्याचा संदेश दिला. कार्यक्रमात बहिणींनी बंधूंना राखी बांधून परस्परांतील आपुलकी व स्नेहाची परंपरा जपली. विशेष म्हणजे शहरातील स्वच्छता कर्मचाऱ्यांनी देखील या उपक्रमात सहभाग नोंदवला.

कार्यक्रमास पिंपरी चिंचवड शहर भाजपचे अध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे, जयनाथ काटे, पि. के. स्कुलचे संस्थापक जग्गनाथ काटे, चॅलेंजर स्कुलचे संस्थापक संदीप काटे, न्यू सिटी प्राईड स्कूलचे अध्यक्ष अरुण चाबुकस्वार, सरचिटणीस भाजपा ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश मनोज ब्राह्मणकर, सामाजिक कार्यकर्ते संदेश काटे, उन्नती सोशल फाउंडेशनचे संस्थापक संजय भिसे, पोपट किसनराव काटे, विकास काटे, आबा पांढरे, जेष्ठ नागरिक संघांचे डॉ सुभाषचंद्र पवार , आनंद हास्य क्लबच्या मीनाक्षी देवतारे, राजेंद्र जसवाल, ज्येष्ठ नागरिक महिला व विविध संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बहिणींना सन्मानित करण्यात आले. सांस्कृतिक सादरीकरणांतून रक्षाबंधनाचा इतिहास आणि समाजातील एकतेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

या प्रसंगी उन्नति सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. कुंदाताई भिसे म्हणाल्या, “समाजातील सर्व घटकांनी परस्परांचा सन्मान ठेवून एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होणे, हीच खरी रक्षाबंधनाची भावना आहे. जात, धर्म, पंथ यांच्या भिंती ओलांडून आपण सर्वांनी एकमेकांचे ‘बंधू-भगिनी’ बनावे, हा या कार्यक्रमाचा संदेश आहे.”

सर्वांच्या सहभागामुळे कार्यक्रमाला समरसतेचा आणि सौहार्दाचा रंग प्राप्त झाला. आयोजकांनी उपस्थितांचे आभार मानत, अशा उपक्रमांमधून समाजात ऐक्य व प्रेम वृद्धिंगत करण्याचा निर्धार व्यक्त केला.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!