शबनम न्यूज | प्रतिनिधी
नवनगर शिक्षण मंडळाच्या सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील NCC विभाग,स्काऊट गाईड, पर्यावरण व विज्ञान मंडळाच्या वतीने ९ ऑगस्ट, क्रांतीदिन व १० ऑगस्ट,संस्थेचे संस्थापक मा.गोविंदराव दाभाडे सर यांच्या वाढदिवस व रक्षाबंधनाचे औचित्य साधून ‘वृक्षारोपणाचा’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
नवनगर मंडळाचे संस्थापक मा. गोविंदराव दाभाडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात कार्यक्रमात आला होता.कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे म्हणून पर्यावरण संवर्धन समितीचे अनिल दोडमणी (ECA कार्यकर्ता) उपस्थित होते. विदयार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुणे म्हणाले,उज्ज्वल भविष्यासाठी प्रत्येकाने आत्ताच झाडे लावणे आवश्यक आहे.प्लास्टिकच्या पिशवींचा वापर न करता कापडी पिशवीचा वापर करावा,जेणेकरून प्लास्टिक प्रदूषण होणार नाही.जास्तीत जास्त वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन करण्यात यावे, असा मोलाचा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राहुल वांगेकर,निवेदन धैर्यशील लवांड,शिक्षक मनोगत प्रतिमा काळे,आभार कैलास कोशिरे यांनी मानले. यावेळी विद्यालयाच्या प्राचार्या संगिता गुरव,पर्यवेक्षक संजय कांबळे संजय,जाधव मनिषा,भोने गणेश,जगदीश चव्हाण सर उपस्थित होते.